पोलीस महासंचालकांना मुदतवाढीचा निर्णय चार आठवड्यात घ्या : हायकोर्टाचे निर्देश

मुंबई: राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांना सेवेत दोन वर्षांची मुदतवाढ देण्यासंदर्भात चार आठवड्यात काय तो निर्णय घ्यावा, असे निर्देश उच्च न्यायालयाने आज केंद्र सरकारला दिले आहेत. मात्र, मुदतवाढी संदर्भात काही आक्षेप असल्यास पुन्हा दाद मागण्याची मुभाही न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिली.

राज्य सरकारने राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांना दिलेली मुदतवाढ ही नियमबाह्य पद्धतीने दिली असल्याचा आरोप करत ऍड. आर. आर. त्रिपाठी यांनी पडसलगीकर यांच्या मुदतवाढीला हायकोर्टात आव्हान दिले आहे. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती जामदार यांच्यासमोर सुनावणी झाली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी राज्य सरकारच्या वतीने ऍडव्होकेट जनर आशुतोष कुंभकोणी यांनी बाजू मांडताना पोलीस महासंचालक हे फार महत्त्वाचे पद आहे. या पदावर कार्यरत असलेले दत्ता पडसलगीकर पायउतार झाल्यास त्या पदावर मुंबई पोलीस आयुक्त पदावरील सुबोध जयस्वाल यांची नियुक्ती करावी लागेल.पडसलगीकर यांच्यानंतर त्या पदावर सेवाज्येष्ठतेनुसार सुबोध जस्वाल यांची नियुक्ती करणे बंधनकारक आहे.

मात्र जयस्वाल यांची अजून चार वर्षांची सेवा शिल्लक आहे. आणि ही दोन्ही पदे प्रशासकीयदृष्ट्‌या अतिमहत्त्वाची आहेत. त्यामुळे त्यांनी आपापल्या पदांवर निदान किमान कार्यकाळ पूर्ण करणे गरजेच आहे, असा राज्य सरकारचा अभिप्राय आहे. त्यामुळे राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून दत्ता पडसलगीकर यांना आणखी दोन वर्षाची मुदतवाढ देण्यात यावी, असा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही, याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. तसेच मुदतवाढ देण्याचा अधिकार केंद्र सरकारला असल्याचा दावा केला.

तर राज्य सरकारचा प्रस्ताव विचाराधीन असून त्यावर लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे केंद्राच्या वतीने सॉलीसिटर जनरल अनिल सिंग यांनी न्यायालयात स्पष्ट केले. याची दखल घेऊन न्यायालयाने पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांना मुदतवाढ देण्यासंदर्भात एका महिन्यात निर्णय घ्या, असे निर्देश दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)