उन्हाचा चटका वाढणार : पुण्याचा पारा 36.3 अंशांवर

पुणे – उन्हाचा चटका वाढल्याने फेब्रुबारीअखेरीसच कडक उन्हाळा जाणवू लागला आहे. राज्यात अनेक ठिकाणी कमाल तापमानाच्या पाऱ्यात तीन ते चार अंशांनी वाढ झाली आहे. आगामी काळात ही राज्यात अंशत: ढगाळ वातावरणासह उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात जवळपास सर्वच ठिकाणी तापमान 35 अंशांच्या वर गेले आहे. कोकणातील सांताक्रूझ, रत्नागिरी येथेही तापमान पस्तिशीपार झाले असून, उन्हाचा ताप वाढला आहे. राज्यात रात्रीचे किमान तापमानाही 17 ते 18 अंशांच्या पुढे गेल्याने थंडी कमी झाली आहे. दुपारी उन्हाचा चटका असह्य होत असतानाच उकाड्यातही वाढ झाली आहे. आगामी काळात रात्रीच्या तापमानात चढ-उतार होण्याची शक्‍यता आहे. तर दिवसाच्या कमाल तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्‍यता आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ओडिशापासून पूर्व मध्य अरबी समुद्रापर्यंत सक्रिय असलेला हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात अंशत: ढगाळ हवामान होत आहे. रविवारी दुपारी दक्षिण गुजरात, मध्य प्रदेशसह धुळे, नंदूरबार परिसरांवर ढग जमा झाले होते. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात अंशत: ढगाळ हवामान झाले होते.

पुणे शहरातही सोमवारी तापमानाचा पारा 36.3 अंश सेल्सिअस नोंदविला गेला. सरासरी तापमानापेक्षा हे चार अंशाने जास्त आहे. याशिवाय किमान तापमानसुद्धा 14 अंशांपर्यत पोहचले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)