राम मंदिराबाबतची सुनावणी 4 जानेवारीला

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयात 4 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराबाबतची सुनावणी होणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आतापासूनच राम मंदिराचा मुद्दा तापला आहे. त्यामुळे त्या सुनावणीबाबत मोठी उत्सुकता आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील पीठापुढे ती सुनावणी होईल. त्यावेळी पुढील सुनावणीसाठी तीन सदस्यीय खंडपीठाची स्थापना केली जाण्याची शक्‍यता आहे.

याआधी न्यायालयाने तातडीने सुनावणी घेण्यास नकार दर्शवला होता. त्यानंतर राम मंदिर उभारणीसाठी कायदा करण्याच्या मागणीने जोर धरल्याने केंद्र सरकारवरील दबाव वाढला आहे. दरम्यान, लवकर निर्णय देणे शक्‍य व्हावे यासाठी दररोज सुनावणी घेतली जावी, अशी भूमिका भाजपकडून मांडण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)