अयोध्या प्रकरणाची सुनावणी २९ जानेवारीपर्यंत टळली 

नवी दिल्ली – अयोध्येतील वादग्रस्त जागेवरील मालकीच्या संबंधातील आजची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा २९ जानेवारीपर्यंत पुढे ढकलली आहे. २९ जानेवारी रोजी नव्या घटनापीठासमोर नियमित सुनावणीची तारीख निश्चित होणार आहे.

अयोध्या वादावर आज सर्वोच्च न्यायालयात पाच सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी झाली. यामध्ये सरन्यायाधीश रंजन गोगोई हे घटनापीठाचे अध्यक्ष असून त्यात शरद बोबडे, एन. व्ही. रमण, उदय उमेश लळित आणि धनंजय चंद्रचूड या न्यायमूर्तीचा समावेश आहे. परंतु, न्या. ललित हे वकील असताना बाबरी मशीद प्रकरणातील आरोपीची बाजू मांडली होती. त्यामुळे या प्रकरणातील घटनापीठात ललित यांच्या समावेशावर मुस्लीम पक्षकारांचे वकील राजीव धवन यांनी आक्षेप घेतला. न्या. उदय उमेश लळित यांनीही या घटनापीठात सहभागी न होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यामुळे आता न्या. लळित यांच्या जागी नवीन न्यायाधीशाचा घटनापीठात समावेश केला जाणार आहे. व २९ जानेवारी रोजी नवीन घटनापीठासमोर नियमित सुनावणीची तारीख निश्चित होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)