चिनी सैनिक फक्त पहाणीसाठी आले होते
नवी दिल्ली – चिनच्या सैनिकांनी लडाख मध्ये डेमचोक भागात घुसखोरी केल्याच्या बातम्या सर्वत्र आल्या आहेत. पण त्याचा भारताचे लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी इन्कार केला आहे.
या घटनेच्या संबंधात माहिती देताना ते म्हणाले की चीनचे सैनिक त्यांच्या हद्दीत गस्त घालत होते. आम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळी तेथे काही स्थानिक लोक त्यांचा उत्सव साजरा करीत होते. ते नेमके काय करीत आहेत हे पहाण्यासाठी काही चिनी लोक तेथे आले होते.
पण ते चिनचे अतिक्रमण नव्हते तेथील सारी स्थिती आता सुरळीत आहे असे विधान त्यांनी केले आहे. दलाई लामांच्या वाढदिवसानिमीत्त 6 जुलैला भारतीय हद्दीतील डोमचेक भागात काहीं तिबेटी नागरीकांनी तेथे तिबेटी ध्वज लावले होते. त्या पार्श्वभूमीवर काही चिनी लोक तेथे काय चालले आहे हे पहाण्यासाठी आले होते. तेथे घुसखोरी किंवा अतिक्रमण झालेले नाही असेही त्यांनी नमूद केले. भारत आणि चीन यांच्यात अनेक ठिकाणी सीमावाद आहे. त्यातून काहीं वेळा एकमेकांच्या हद्दीत घुसण्याचा प्रकार होतो. दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये सन 2017 ला डोकलाम मध्ये 73 दिवसांचा तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर प्रथमच चिनी सैनिकांनी भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याचे वृत्त आले आहे.