गुर्जर आंदोलन चौथ्या दिवशीही सुरुच

राष्ट्रीय महामार्ग 11 आणि अन्य मार्गांवरची वाहतुक अन्यत्र वळवली

जयपूर : राजस्थानमध्ये गुर्जर समाजाला सरकारी नोकऱ्या आणि शिक्षण संस्थांमध्ये 5 टक्के आरक्षण मिळावे या मागणीसाठी भडकलेले गुर्जर आंदोलन आज चौथ्या दिवशीही सुरुच राहिले. गुर्जर समाजाच्या कार्यकर्त्यांनी राजस्थानातील दौसा जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग 11 रोखून धरला. त्यामुळे जयपूर – आग्रा मार्गावरची वाहतुक खोळांबली.

रविवारी या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. धोलपूर जिल्ह्यात पोलिसांना गोळीबार करावा लागला तर पोलिसांची काही वाहने पेटवूनही देण्यात आली होती. त्यामुळे प्रशासनाने धोलपूर आणि करौली जिल्ह्यांमध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.

आज आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्ग-11 रोखून धरला. कालच्याच ठिकाणी आजही पुन्हा वाहतुक रोखून धरली. सवाई माधोपूर, बुदला येथील वाहतुक रोखली गेल्याचे पोलिस महासंचालक (कायदा सुव्यवस्था) एम.एल.लाथर यांनी सांगितले. या मार्गावरची वाहतुक अन्य मार्गांनी वळवण्यात आली असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचेही पोलिसांनी सांगितले. सद्यस्थितीत राजस्थानातील 1 राष्ट्रीय महामार्ग, 1 राज्य महामार्ग, दोन जोड हमरस्ते आणि दिल्ली- मुंबई रेल्वेमार्ग रोखले गेले आहेत. आज हजरत निझामुद्दीन, अमृतसर- मुंबई सेंट्रल, फिरोझपूर- मुंबई सेंट्रल आणि डेहराडून-कोचिवेली या चार रेल्वे अन्य मार्गांनी वळवण्यात आल्या. शुक्रवारी आंदोलन सुरु झाल्यापासून सुमारे 250 रेल्वेगाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

वाटाघाटींना सुरुवात
गुर्जर समाजाचे नेते किरण सिंह बैन्सला आणि त्यांच्या समर्थकांनी रेल्वेमार्गावर शुक्रवारपासून सुरु केलेले धरणे आंदोलन सोडावे आणि सरकारबरोबर चर्चा करावी, असे आवाहन मुख्यमंत्री अशोक गेहलोक यांनी केले आहे. मात्र जोपर्यंत 5 टक्के आरक्षणाची मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत धरणे आंदोलन न सोडण्याचा निर्धार गुर्जर समाजाच्या नेत्यांनी व्यक्‍त केला आहे. राज्याचे पर्यटन मंत्री विश्‍वेंद्र सिंह आणि प्रशासकीय अधिकारी नीरज के. पवन यांनी शनिवारी आंदोलकांशी चर्चा केली. मात्र त्यांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)