इतिहासातील सर्वांत मोठा विजय

2014 च्या लोकसभा निवडणुकीत बीड मतदारसंघातून भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे विजयी झाले. पण अवघ्या काही दिवसांतच त्यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर रिक्‍त झालेल्या बीडच्या जागी गोपीनाथरावांच्या कन्या प्रीतम मुंडे या पोटनिवडणुकीत उभ्या राहिल्या. या निवडणुकांत कॉंग्रेसने ए. एस. पाटील यांना रिंगणात उतरवले होते. या निवडणुकीत प्रीतम मुंडे यांना तब्बल 6,96,321 मते मिळाली; तर पाटील यांना 2,26,095 मते मिळाली. म्हणजेच तब्बल 4 लाख 70 हजारांहून अधिक मताधिक्‍यांने प्रीतम मुंडे यांनी विजय मिळवला. हा भारतीय निवडणुकीच्या इतिहासातील सर्वांत मोठा विजय मानला जातो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)