शेतकऱ्यांना, जनतेला फसवणारे सरकार म्हणजे ‘ठग्ज ऑफ महाराष्ट्र’- धनंजय मुंडे.

मुंबई: विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरवात होत आहे. त्यापूर्वी विरोधी पक्षांकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. दरम्यान विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

शेतकऱ्यांना, युवकांना, जनतेला, फसवणारे सरकार म्हणजे ठग्ज ऑफ महाराष्ट्र आहे. ज्यावेळी सरकारला निवडणुकीनंतर आपल्याला वनवासाला जावं लागणार आहे, असे वाटते त्यावेळी भाजपा, शिवसेनेला राम आठवतो, अशी टीका धनंजय मुंडे यांनी भाजप शिवसेनेवर केली.

धनंजय मुंडे म्हणाले, अधिवेशनाचा कालावधी ८ दिवसांचा आहे. पहिल्यांदाच एवढा कमी कालावधी सरकारने ठेवला. ७०% महाराष्ट्र दुष्काळात होरपळत आहे. मराठा आरक्षण,धनगर आरक्षण, मुस्लिम आणि लिंगायत आरक्षण हे सर्व प्रश्न तात्काळत राहिल्यामुळे अधिवेशन कमीत कमी ३ आठवड्यांचे पाहिजे होते. सरकार दुष्काळाबाबत गंभीर नाही. मुख्यमंत्र्यांनी दुष्काळापेक्षा प्रमुख योजनांचा आढावा घेण्यातच धन्यता मानत आहेत. 50 हजार हेक्टरी मदत द्या, त्या शिवाय कामकाज चालु देणार नाही. फळबागांना 1 लाख हेक्टरी मदत द्या, त्याची तात्काळ घोषणा करा, नाहीतर अधिवेशन कामकाज सुरळीत चालू देणार, अशे मुंडे म्हणाले.

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद मुंबई

Posted by Dhananjay Munde on Sunday, 18 November 2018


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)