पुणतांब्याचे उपोषण सरकारने मोडीत काढले नाही : राम शिंदे

संग्रहित छायाचित्र

कोल्हापूर : पुणतांब्याच्या शेतकऱ्यांच्या मुलींनी केलेल्या अन्नत्याग उपोषणाच्या पार्श्वभूमीवरती राम शिंदे यांनी सरकारच्या वतीने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शेतकऱ्यांच्या मुलींनी सुरू केलेले उपोषण आता संपले असून हे उपोषण सरकारने मोडीत काढले नाही, अशी स्पष्टोक्ती राम शिंदे यांनी दिली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या मुलींच्या मागण्या लेखी स्वरुपात घेतल्या असून सरकारने देखील त्यांना लेखी उत्तर दिले आहेत.

कोल्हापुर येथे आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांच्या मुलींची तब्येत प्रचंड खालावलेली होती. त्यामुळे त्यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने रुग्णालयात दाखल करावे लागले. एखाद्याच्या जीवाशी खेळणं हे कदापि बरोबर नाही, असे देखील ते म्हणाले.

खासदार राजू शेट्टी हे देखील अनेक आंदोलने करतात. काही आंदोलने तर टोकाची असतात. परंतु या शेतकऱ्यांच्या मुलींनी केलेले उपोषण हे त्यांचं वय आणि त्यांची प्रकृती पाहता डॉक्‍टरांच्या सल्ल्याने त्यांना दवाखान्यात उपचारासाठी नेण्याचे हे गरजेचे होते. तसेच राजू शेट्टींनी यापूर्वी जी आंदोलने केली त्या आंदोलनात त्यांनी आश्वासन दिल्यानंतर माघार घेतल्याचे राम शिंदे यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता पुणतांब्याच्या उपोषणाचा विषय संपला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उपाशी मुलींचा तळतळाट लागणार – खासदार राजू शेट्टी
अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबे येथे सहा दिवसांपासून एकाच कुटुंबातील शेतकऱ्यांच्या मुलींनी उपोषण सुरू केले होते. आपल्या विविध मागण्यांसाठी सुरू केलेल्या हे उपोषण सरकारने प्रशासनाच्या मदतीने मोडून काढले आहे. डिजिटल इंडियाची भाषा करणाऱ्या पंतप्रधान, कृषिमंत्री, मुख्यमंत्री यांनी त्यांच्याशी निदान व्हिडीओ कॉन्फरसनद्वारे संवाद साधण्याची गरज होती. त्यांचे उपोषण मोडून काढणे हे चुकीचे असून उपाशी मुलींचा तळतळाट या सरकारला लागल्याशिवाय राहणार नाही, असे म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी सरकारवर टीका केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
2 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)