स्वाभिमानी नाभिक संघटनेचा मेळावा उत्साहात

उंब्रज – ज्या संघटनेमुळे सुरक्षित भावना निर्माण होते, ती संघटना किंवा संघटन कुशल होय, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी नाभिक संघटनेचे राज्याध्यक्ष शंकर गायकवाड यांनी केले. येथे आयोजित नाभिक संघटनेच्या मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष अधिकराव चव्हाण, प्रवक्ते कृष्णत जाधव, बाळासो ढवळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड उपस्थित होते. प्रारंभी जिल्हा तसेच तालुका कार्यकारणीची निवड करण्यात आली. यावेळी नाभिक समाजातील गुणवंत खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.

गायकवाड पुढे म्हणाले, महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी संघटनेच्या माध्यमातून समाजातील लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी धडपड सुरू आहे. अन्यायाला वाचा फोडणे, व्यवसायात वाढ करणे, तळागाळातील लोकांना आर्थिक संकटातून बाहेर काढणे आदी कामे संघटना करत आहे. ही संघटना कोण्या एकट्या दुकट्याची नसून, सर्व समाज बांधवांची आहे.
अजय गोरड म्हणाले, संघटना समाजाला नवी दिशा देण्याचे काम करत असते. गुणवंत विद्यार्थ्यांचा यथोचित सत्कार करून त्यांना प्रोत्साहन देऊन नवनवीन संधी उपलब्ध करून द्या. जेणेकरून आपला पाल्य स्वतःच्या पायावर उभा राहून सक्षम बनू शकेल. समाजात घडत असलेल्या चुकीच्या घटनांची कल्पना पोलिसांना देवून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. दत्ता ठोंबरे, प्रताप भोसले, प्रकाश सुरमुख, रामभाऊ पवार, मंगेश काशिद, तपस्या काशिद यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक अवधुत माने यांनी केले. सूत्रसंचालन व आभार कृष्णत जाधव यांनी मानले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)