724 महिला उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार

नवी दिल्ली – लोकसभेच्या नुकत्याच संपलेल्या निवडणुकीतील एकूण 7928 उमेदवारांपैकी महिला उमेदवारांची संख्या 724 इतकी आहे. त्यांचे भवितव्यही उद्याच्या मतमोजणीत निश्‍चीत होणार आहे. कॉंग्रेसने या निवडणुकीत सर्वाधिक 54 महिला उमेदवारांना संधी दिली असून भारतीय जनता पक्षाने एकूण 53 महिलांना उमेदवारी दिली आहे. अन्य पक्षांमध्ये समाजवादी पक्षाने 24, तृणमुल कॉंग्रेसने 23, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने 10, कम्युनिस्ट पक्षाने 1 आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने एका महिलेला उमेदवारी दिली आहे.

222 महिलांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली आहे. त्या खेरीज चार तृतीय पंथीयांनी यंदा अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली आहे. आम आदमी पक्ष हा एकमेव असा राजकीय पक्ष आहे की ज्यांनी एका तृतीयपंथीय उमेदवाराला अधिकृतपणे पक्षाची उमेदवारी दिली आहे. या एकूण 724 महिला उमेदवारांपैकी 100 उमेदवारांवर फौजदारी गुन्हे आहेत. त्यातील 78 महिला उमेदवारांवरील गुन्हे गंभीर स्वरूपाचे आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)