“एफआरपी’ प्रश्‍नी स्वाभिमानीची न्यायालयात धाव

दर ठरविताना केंद्र सरकारने फसवणूक केल्याचा आरोप

पुणे – यंदाच्या गाळप हंगामासाठी केंद्र सरकारने उसाची “एफआरपी’ ठरविताना 9.5 टक्केचा आधार 10 टक्के करुन शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. त्यामुळे या निर्णयाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गेल्या आठवड्यात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांच्यावतीने ऍड. योगेश पांडे यांनी ही याचिका दाखल केली आहे. यावर दि. 26 नोव्हेंबर रोजी होणार आहे. खा. शेट्टी म्हणाले, केंद्र सरकारने “एफआरपी’च्या बेस रेट मध्ये 0.5 टक्के बदल केल्याने राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 1,300 कोटींपेक्षा जास्त फटका बसणार आहे. जसजशी उसातील रिकव्हरी वाढत जाते, तसे प्राप्त देय रक्कम कमी होत जाते, हे आम्ही न्यायमूर्तींसमोर मांडत उसाची “एफआरपी’ ठरविताना रिकव्हरी पूर्ववत 9.5 टक्के ठेवण्यात यावी, ही प्रमुख मागणी केली आहे. तसेच जोपर्यंत याचिका निकाली निघत नाही, तोपर्यंत प्रस्तूत केलेल्या रिकव्हरीच्या बदलाच्या अंमलबजावणीस स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी केली आहे

“एफआरपी’च्या बेस रेटमध्ये बदल केल्याने काय अडचण होणार आहे, याबाबत केंद्रीय कृषिमंत्री, अन्न-पुरवठामंत्री, सर्व सचिव, साखर संचालक तसेच कृषी मूल्य आयोग यांची भेट घेण्यात आली आहे. त्यांना प्रस्तावित बदलामुळे शेतकऱ्यांना होणार असलेल्या आर्थिक नुकसानीची माहिती दिली आहे. यात नक्कीच सुधारणा करू, असे आश्‍वासन या सर्वांनी दिले होते. मात्र, दोन महिने उलटून गेले तरी याबाबत कोणताही खुलासा केंद्र सरकारने केलेला नाही. एका लोकप्रतिनधीची ही अवस्था असेल, तर शेतकऱ्यांनी व्यथा कोणाकडे मांडाव्यात, असा सवाल शेट्टी यांनी केली आहे.

गतवर्षात ऊस उत्पादन खर्चात भरघोस वाढ झाली आहे. तर, ऊस दर नियंत्रण कायद्यामध्ये स्पष्टपणे उसाची उचित निर्धारित किंमत ठरविताना ऊस उत्पादन खर्च विचारात घेतला जावा, असे नमूद असल्याने प्रस्तावित रिकव्हरी बदल कायदा मोडणारा असल्याचे ऍड. योगेश पांडे यांनी सांगितले. पांडे यांच्याबरोबर संदीप कोरेगावे, ऍड. रामराजे देशमुख हे याचिकेचे काम पाहत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)