आयपीएलमधेच चौथ्या क्रमांकावरील खेळाडू स्पष्ट होइल – सौरव गांगुली

संग्रहित छायाचित्र...

कोलकाता: सध्या भारतीय संघ मधल्याफळीतील अपयशाशी झुंजत असला तरी भारतीय संघातील चौथ्या स्थानावर अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मात्र, मला वाटते हा क्रमांक पर्यायी खेळाडूंनी आयपीएलमधील केलेल्या कामगिरीनंतरच निश्‍चित होईल असे मत भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने व्यक्त केले आहे.

या वेळी बोलताना गांगुली म्हणाला की, चौथ्या क्रमांकावर मला चेतेश्वर पुजाराही योग्य वाटतो. कारण तो सध्या चांगल्या फॉर्मात आहे. मी जेव्हा कर्णधार होतो, तेव्हा राहुल द्रविड या क्रमांकावर यायचा. जर तुमच्याकडे कुठलाच पर्याय नसेल, तर पुजाराला संधी देता येईल. पंत आणि रायुडू हेदेखील पर्याय असू शकतात. मात्र, या क्रमांकासाठी आपण केवळ विचार मांडू शकतो. पण, कर्णधार कोहलीने या क्रमांकावरचा खेळाडू आधीच निश्‍चित केला असेल. तसेच पुढे बोलताना गांगुली म्हणाला, गेल्या आयपीएलमध्ये पंतने चांगली कामगिरी केली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत त्याला केवळ दोनच लढतींमधे संधी मिळाली. पंत हा भारतीय संघाचे भविष्य आहे. पुढील दहा वर्षांत त्याच्याकडून तुम्हाला खूप काही बघायला मिळेल.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)