रेणुका माता सहकारी संस्थेच्या माजी व्यवस्थापकास अटक

मनी लॉंडरींगच्या आरोपाखाली “ईडी’कडून कारवाई

नवी दिल्ली- अहमदनगर जिल्ह्यातील रेणुकामाता सहकारी नागरी पतसंस्थेचे माजी व्यवस्थापक मच्छिंद्र खाडे यांना सक्‍तवसुली संचलनालयाने अटक केली आहे. खाडे यांना “मनी लॉंडरिंग’च्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे, असे “ईडी’ने म्हटले आहे. विविध बॅंकांच्या रेणुका माता पतसंस्थेच्या खात्यांवर रोख रक्कम जमा करण्यास सहाय्य केल्याचा खाडे यांच्यावर आरोप आहे. विविध खात्यांवर जमा करण्यात आलेली ही रक्कम नंतर हॉंगकॉंगवरून हिरे आयातीची बनावट कागदपत्रे दाखवून या निधीचा गैरव्यवहार करण्यात आला असल्याचेही “ईडी’ने म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राज्याच्या पोलिसांनी दाखल केलेल्या “एफआयआर’च्या आधारे “ईडी’ने या पतसंस्थेच्या तपासासास सुरुवात केली होती. या तपासामध्ये खाडे यांनी अनेक बॅंक खात्यांचा वापर रोख रक्कम जमा करण्यासाठी केला गेला असल्याचे निदर्शनास आले. कोअर बॅंकिंग आणि “आरटीजीएस’द्वारे या खात्यांवरून पतसंस्थेच्या खत्यामध्ये मोठी रक्कम जमा केली जात असे.

बॅंकेतील खातेदारांच्या स्वाक्षऱ्या खाडे यांनी कोऱ्या”आरटीजीएस’च्या कागदपत्रांवर मिळवल्या आणि त्या स्लीपा आपल्या जवळ ठेवल्या होत्या. आतापर्यंत 120 कोटी रुपये या खात्यांवर जमा करण्यात आली आणि “आरटीजीएस’द्वारे वेगवेगळ्या कंपन्यांच्या खात्यांवर जमा केली गेली. शेवटी बनावट बिलाच्या आधारे देशातून हॉंगकॉंगमधील कंपनीच्या खात्यावर वळवण्यात येत असल्याचे “ईडी’ने म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)