राशी-भविष्य : 21 ते 27 जानेवारी 2019 पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे

मेषेत हर्षल, कर्केत राहु, वृश्‍चिकेत गुरु, शुक्र, धनूमध्ये शनी प्लुटो, मकरेत रवी, केतू, बुध, कुंभेत नेप्च्यून तर मीनेत मंगळ आहे. तुमचा उत्साह वाढवणारे ग्रहमान आहे. कामाची योग्य आखणी करून कामे मार्गी लावाल. खर्च वाढला तरी तो चांगल्या कामासाठीं असल्याने समाधान मिळेल. सहकारी मदत करतील. 

प्रवासयोग 

ग्रहांची मर्जी आहेच तेव्हा कामाचा उत्साह पुरेपुर राहील. मात्र विचारपूर्वक कामाचे नियोजन करा. व्यवसायात रेंगाळलेली कामे हाती घेऊन पूर्ण करावी लागतील. नको त्या कामात वेळ व पैसा खर्च होईल. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. कामाची आखणी करून कामे वेळेत पूर्ण करावी लागतील. प्रवासयोग संभवतो. घरात सामोपचाराची भूमिका ठेवलीत तर मतभेद
होणार नाहीत.
शुभ दिनांक : 21, 22, 23, 24, 27 

अनपेक्षित लाभ

सारासार विचार करून मगच निर्णय घेतलात तर लाभ तुमचाच होईल. व्यवसायात नवीन संधी चालून येतील. कामामुळे नवीन हितसंबंध जोडले जातील. परदेशव्यवहाराच्या कामांना गती येईल. अनपेक्षित लाभ होतील. नोकरीत वरिष्ठ व सहकाऱ्यांची मदत मिळेल. केलेल्या कामाचे कौतुक होईल. प्रतिष्ठा मिळेल. घरात व्यक्‍तींचा आधार वाटेल. महिलांनी मानले तर समाधान मिळेल.
शुभ दिनांक : 21,22, 23, 24, 25

अनावश्‍यक खर्च

आत्मीक बळ उंचावेल. त्यामुळे कामात उंच भरारी मारावीशी वाटेल. परंतु मनाला थोडा लगाम घाला. व्यवसायात योग्य व्यक्‍तींची मदत घेऊन कामे संपवा. नवीन कामे हाती घेताना यातील त्रुटी व नियमांचा अभ्यास करा. कुवत आर्थिक व शारीरिक ओळखून कामाचा विस्तार करा. नोकरीत खुबीने सहकार्यांकडून काम करून घ्या. घरात कमी बोलून कृती अधिक करा. प्रियजनांच्या भेटीचा योग.
शुभ दिनांक : 21, 22, 23, 24

विशेष लाभ

तुमच्या जीवनात भावनेला अनन्यसाधारण महत्व असते. त्यामुळे माणसे जोडण्यात तुमचा हातखंडा असतो. असाच अनुभव येईल. व्यवसायात तडजोडीचे धोरण स्वीकारुन कामांची पूर्तता कराल. जुने व नवीन हितसंबंध प्रस्थापित कराल. पैशाची वसुली झाल्याने चिंता नसेल. जोडधंद्यातून विशेष लाभ संभवतो. घरात मुलांच्या व इतर व्यक्‍तींच्या हौसेखातर हात सढळ ठेवावा लागेल.
शुभ दिनांक : 21, 22, 23, 24,25

वातावरण आनंदी 

रवी तुमचा राशीस्वामी असल्याने तुमचा निर्णय ठाम असेल. व्यवसायात कोणत्याही प्रश्‍नावर धडाडीने निर्णय घेऊ शकाल. प्रश्‍नांची उकल झाल्याने बरेच प्रश्‍न सुटतील. मन शांत ठेवून कामाचे नियोजन करा नोकरीत वरिष्ठ दिलेले आश्‍वासन पाळतील. बदल किंवा बदली यासाठी प्रयत्न केल्यास यश मिळेल. प्रियजनांच्या भेटीने आनंद वाटेल. मनोकामना पूर्ण होतील. आवडत्या छंदात मन रमवाल.
शुभ दिनांक : 23, 24,25, 26, 27

विनाकारण गैरसमज

अत्यंत धोरणी असे व्यक्‍तीमत्वामुळे सहसा फसवणूक होत नाही. व्यवसायात निर्णय घेताना अनुभवी व्यक्‍तींचा सल्ला फायद्याचा ठरेल. आर्थिक बजेट आखून त्याप्रमाणे कामाची पूर्तता कराल. नोकरीत विनाकारण गैरसमज होण्याची शक्‍यता. कामात चोख राहा. कुसंगत टाळा. घरातील व्यक्‍तींकडून फारशी अपेक्षा ठेवू नका. खर्चावर नियंत्रण ठेवा. महिलांनी शब्द हे शस्त्र आहे हे लक्षात ठेवा.
शुभ दिनांक : 21, 22, 25, 26, 27

सुवार्ता कळेल

प्रगतीचा आलेख चढा राहील. त्यामुळे “रात्र थोडी सोंगे फार’ अशी अवस्था तुमची असेल. व्यवसायात नवीन कामे मिळतील. कार्यक्षेत्र रुंदावल्याने कामाचा व्याप वाढेल. दगदग धावपळ वाढेल. पैशाच्या कामांना प्राधान्य द्या. नोकरीत स्वयंभू राहिलात तर कामात तुमची खोटी होणार नाही. सहकारी दिलेली आश्‍वासने पाळतील ही अपेक्षा नको. घरात दुरुस्त्या, सजावट,
नवीन खरेदी इ. गोष्टींकडे लक्ष द्यावे लागेल.
शुभ दिनांक : 21, 22, 23,24, 27

पैशाची चिंता मिटेल

महत्वाकांक्षा बळावेल. त्यामुळे कामाचा जोर वाढेल. व्यवसायाला योग्य दिशा मिळेल. त्याप्रमाणे कामाची आखणी कराल. ज्यांच्याकडून काम करून घ्यायचे अशा व्यक्‍तींना खुष ठेवाल. पैशाची चिंता मिटेल. नोकरीत मनाविरुद्ध गोष्टी घडल्या तरी तुमची प्रतिक्रिया व्यक्‍त करण्याची घाई नको. मुलांच्या प्रगतीकडे लक्ष द्यावे लागेल. महिलांनी मनन चिंतन करावे.
शुभ दिनांक : 21, 22, 24, 25, 26

विशेष लाभ

तणाव कमी झाल्याने पुन्हा जोमाने कार्यरत व्हाल. व्यवसायात दुर्लक्ष झालेली कामे हाती घेऊन पूर्ण करण्याचा इरादा असेल. अपेक्षित व्यक्‍तींकडून सहकार्य मिळेल. जुनी येणी वसुल झाल्याने पैशाची चणचण कमी होईल. खेळत्या भांडवलाची तरतूद हितचिंतकाकडून होईल. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. घरात चांगल्या वातावरणामुळे मन प्रसन्न राहील. चांगली बातमी कळेल.
शुभ दिनांक :23,24, 25, 26, 27

कृतीवर भर द्या

मनातील बेत प्रत्यक्षात साकार करण्यासाठी सज्ज व्हाल. परिस्थितीनुरूप बदल करून कार्यभाग साधाल. व्यवसायात जमाखर्चाचा ताळमेळ घालून त्याप्रमाणे कामाचे नियोजन करा. नोकरीतील कामात गुप्तता राखा. बोलण्यापेक्षा कृतीवर भर द्या. कायद्याचा भंग होणार नाही याची काळजी घ्या. नवीन नोकरीचा बेत तूर्त लांबणीवर टाका. घरात भावनोद्रेक टाळा. प्रियजनांच्या भेटीचे योग.
शुभ दिनांक : 21, 22, 25, 26, 27

स्वयंसिद्ध रहा

शांत चित्ताने येणाऱ्या घटनांकडे बघा. व्यवसायात महत्वाच्या कामांना प्राधान्य द्या. नवीन कामाच्या संधी चालून येतील. त्या स्वीकारताना त्यातील बारकाव्यांचा नीट अभ्यास करा. वेळ व पैसे यांचे गणित आखून जोखीम स्वीकारा. नोकरीत खुषीने वागून सहकाऱ्यांकडून कामे करून घ्या. सभोवतालच्या व्यक्‍तींचे निष्कारण होणारे गैरसमज टाळा. घरात स्वयंसिद्ध राहा. सामंजस्याने प्रश्‍न मार्गी लावा.
शुभ दिनांक : 23, 24, 27

आर्थिक चिंता मिटेल

गुरुची साथ मिळेल. त्यामुळे अपेक्षित प्रगती होईल. मनोबल वाढेल. व्यवसायात पैशाचे व्यवहारात चोख राहा. मैत्री व व्यवहार यांची गल्लत करू नका. कामाचा उरक दांडगा राहील. नवीन कामेही मिळतील. नोकरीत माणसांची पारख महत्वाची ठरेल. मिळालेल्या अधिकारांचा गैरवापर करण्याचा मोह टाळा. घरात वादाचे मुद्दे टाळा. हटवादी धोरण बाजूला
ठेवा.
शुभ दिनांक : 21, 22, 25, 26

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)