मंगळ ग्रहावरील पहिली सेल्फी इनसाईटची!

वॉशिंग्टन (अमेरिका): मंगळ ग्रहावर पहिली सेल्फी घेण्याचा मान अमेरिकन यान इनसाईटला मिळाला आहे. मंगळावर उतरलेल्या इनसाईटने आपल्या रोबोटिक हाताचा वापर करून मंगळावर पहिली सेल्फी घेतली आहे. आणि ती पृथ्वीवर पाठवली आहे. 11 छोट्या छोट्या चित्रांचा समूह असलेल्या या फोटोत इनसाईटचा डेक, सोलर पॅनल आणि वैज्ञानिक उपकरणेही दिसत आहेत.

मे महिन्यात मंगळ मोहिमेवर पाठवलेले इनसाईट लॅंडर 26 नोव्हेंबर रोजी मंगळावर पोहचले आहे. त्यानंतर दोन आठवड्यांनी 52 छोटेमोठे फोटो एकत्र केलेला मंगळाचा विशाल फोटो मिळाला आहे. या फोटोचा अभ्यास केल्यानंतर शास्त्रज्ञ इनसाईटवर असलेले भूकंप आणि उष्णता लहरी मोजणारी उपकरणे कोठे तैनात करायाची याचा निर्णय घेणार आहेत. सपाट भूपृष्ठावर चांगले काम करू शकणाऱ्या इनसाईटला मंगळाच्या कमी खडकाळ असलेल्या इल्सियम प्लेनिशिया या भागात उतरवण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आमच्या उपकरणांसाठी हे क्षेत्र अपेक्षेपेक्षाही चांगले असल्याचे आणि या भागात खडक, टेकड्या नसल्याने जमिनीत खोलवर खोदकाम करता येणार आहे, इनसाईट मिशनचे प्रमुख शास्त्रज्ञ ब्रूस बेनेरडिट यांनी म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)