पॅरिस मध्ये चित्रित झालेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’!

जगभरात फ्रान्समधील पॅरिस हे शहर सर्वात ‘रोमँटिक’ शहर म्हणून ओळखले जाते. म्हणूनच अनेक चित्रपटांचे, हिंदी सुद्धा, चित्रीकरण तेथे झाले आहे. परंतु पहिल्यांदाच एखाद्या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण फ्रान्स या देशामध्ये झाले आहे. आगामी मराठी चित्रपट ‘आरॉन‘ याचे बहुतांश चित्रीकरण फ्रान्समध्ये झाले असून त्या देशात घडणारी कथा या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. दिग्दर्शकाने बालक व पालकांच्या मनोविश्वावर आधारित या कथानकाला हळुवारपणे हाताळत चित्रपटाच्या रंजकतेत भर टाकलीय.

‘आरॉन‘ चित्रपटाची निर्मिती गिरीश नारायण पवार, कौस्तुभ लटके, अविनाश अहेर यांनी केली असून ओमकार रमेश शेट्टी यांनी दिग्दर्शनाची धुरा वाहिली आहे. ‘होणार सून ….’ फेम शशांक केतकर, ‘पोश्टर बॉईझ/गर्ल’ फेम नेहा जोशी व ‘उंबटु’ फेम अथर्व पाध्ये यांच्या ‘आरॉन’ मध्ये प्रमुख भूमिका आहेत. त्याचप्रमाणे बंगाली चित्रपटांमधील सुपरस्टार स्वस्तिका मुखर्जी ‘आरॉन’ द्वारे मराठी चित्रपटात पदार्पण करीत आहे.

-Ads-

या चित्रपटाची पटकथा व संवाद स्वामी बाळ व ओमकार शेट्टी यांच्या लेखणीतून अवतरले आहेत. छायाचित्रीकरणाची बाजू सांभाळलीय सुमन साहू व मार्तोन विझकेलेटी यांनी. संकलक आहेत आशिष म्हात्रे व अपूर्वा मोतीवाले सहाय. सचिन लोवलेकर व संतोष गायके यांनी अनुक्रमे वेशभूषा व मेकअप ची जबाबदारी पार पाडलीय तसेच कलादिग्दर्शन केलंय जगन्नाथ हटनकर यांनी. ‘आरॉन’ ला संगीत दिलंय चिन्मय लेले यांनी तर पार्श्वसंगीत दिलंय साई-पियुष यांनी. या चित्रपटाचे असोसिएट डिरेक्टर आहेत अमोल घरत व असोसिएट प्रोड्युसर आहेत अऱ्हिमा शर्मा. क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहेत एली लसझिओ बर्गर आणि लाईन प्रोड्युसर आहेत आनंद नामदेव गायकवाड व राहुल दीनानाथ तुळसकर. जीएनपी फिल्म्स ची प्रस्तुती असलेला ‘आरॉन‘ येत्या ७ डिसेंबर ला संपूर्ण भारतात (‘पॅन-इंडिया’) प्रदर्शित होणार आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)