भारतात लवकरच पहिली इराणी बॅंक सुरू होणार : केंद्राने दिली मंजुरी

नवी दिल्ली: भारतात लवकरच एका इराणी बॅंकेची शाखा सुरू होणार आहे. मुंबईत सुरू होणाऱ्या या शाखेसाठी भारत सरकारने मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री जवाद शरीफ यांच्या भेटीनंतर ही माहिती दिली आहे. जवाद शरीफ हे सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत.

पसरगाद या इराणी बॅंकेची येत्या तीन महिन्यात मुंबईत शाखा सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठीची मंजुरी केंद्र सरकारने अगोदरच दिलेली असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

इराणचे परराष्ट्र मंत्री जवाद शरीफ यांच्याशी आपली अनेक मुद्‌द्‌यांवर समाधानकारक चर्चा झाल्याचे स्पष्ट करताना इराणमधील चाबहार बंदरातून मालवाहतूक सुरू झाल्याचा उल्लेख नितीन गडकरी यांनी केला. चाबहार बंदरात माल घेऊन पहिले जहाज ब्राझीलहून आल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)