पहिले लढाऊ मालवाहतूक विमान “डेकोटा” कात टाकली

– “परशुराम’ अर्थात “डेकोटा’चे ओझर विमानतळावर यशस्वी “लॅंडिंग’
– “एरो इंडिया’ आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात होणार सादरीकरण

पुणे – भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये 1947 साली असलेल्या संघर्षाच्या परिस्थितीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे आणि भारतीय हवाई दलातील पहिले लढाऊ वाहतूक विमान अशी ओळख असणारे “डेकोटा’ विमान नुकतेच हवाई दलात पुनरागमन झाले आहे. “परशुराम’ असे नामकरण करण्यात आलेल्या या विमानाने नुकतेच नाशिक येथील हवाई दलाच्या ओझर विमानतळावर यशस्वी “लॅंडिंग ‘ केले आहे.

हवाई दलातील पहिले ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट अशी ओळख असणारे “डग्लस सी -3′ म्हणजेच “डेकोटा’ हे लढाऊ विमान 1944 मध्ये हवाई दलात सहभागी झाले होते. विविध लष्करी. मोहिमांमध्ये या विमानाने अतिशय महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. छोट्या धावपट्टीवरून उड्डाण भरण्याच्या क्षमतेमुळे “डेकोटा’ हे विमान त्यावेळचे महत्त्वपूर्ण लढाऊ विमान सिद्ध झाले होते. इतकेच नव्हे, तर दुसऱ्या महायुद्धातील या विमानाची कामगिरी हा संरक्षण क्षेत्रातील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली. विशेषतः पाकिस्तानविरोधातील युद्धात या विमानाने महत्त्वाची कामगिरी पार पाडली.

या लढाऊ विमानाची उपयुक्तता लक्षात घेत, हवाई दलातर्फे हे विमान पुन्हा एकदा कार्यान्वित करण्याचा निर्णय 2011 मध्ये घेण्यात आला. त्यानुसार युनायटेड किंगडम येथे हे काम करण्यात आले. 13 फेब्रुवारी 2018 रोजी खासदार राजीव चंद्रशेखरन्‌ यांनी सन्मानपूर्वक हे विमान हवाई दलप्रमुखाना सोपावले. नुकतेच हे विमान ओझर येथील हवाई दलाच्या विमानतळावर आगमन झाले आहे. बंगळुरू येथे हवाई दलातर्फे आयोजित “एरो इंडिया 2019′ आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात हे विमान प्रदर्शित केले जाणार आहे.

 धावपट्टी नसतानाही विमान उतरले लेहमध्ये

1944 साली सुरू असलेल्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान “डेकोटा’ विमानाला लेह येथे मोहिमेवर पाठविण्याचा विचार सैन्यातर्फे केला गेला. मात्र, तेथे धावपट्टी नसल्याने हे विमान उतरवायचे कोठे, असा प्रश्‍न निर्माण झाला होता. त्यावेळी एअर कमोडोर मेहर सिंग यांनी न केवळ हे विमान उडविले, परंतु कोणत्याही नकाशाशिवाय उड्डाण करत लेह येथे सिंधू नदीकिनारी सुमारे 11,540 फूट उंचीवर हे विमान उतरवित विमान वाहतूक क्षेत्रात इतिहास रचला. इतकेच नव्हे, तर “डेकोटा’ विमानातून जमिनीवर मारा करण्याचे तंत्रदेखील विकसित केले. “डेकोटा’ विमानाच्या कारकिर्दितील हा एक महत्त्वपूर्ण बदल होता.

देशात मोजकेच वैमानिक

“डेकोटा’ हे विमान उडविण्याचे कौशल्य आत्मसात केलेले मोजकेच वैमानिक भारतीय हवाई दलात आहेत. अशा निवडक वैमानिकांपैकी एक असलेले ग्रुप कॅप्टन अजय मेनन हे सध्या ओझर येथील हवाई दलाच्या विमानतळावर कार्यरत आहेत. दलासाठी ही एक अभिमानाची बाब असल्याचे तलाचे प्रमुख एअर कमोडोर समीर बोराडे यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)