प्रविण तरडे यांना मारहाण करुन कार्यालयाची तोडफोड
पुणे: मराठी चित्रपटसृष्टीतील बहुप्रतिक्षित ठरत असलेला मुळशी पॅटर्न चित्रपटाचे दिग्दर्शन प्रविण तरडे यांच्या कार्यालयांची तोडफोड करत त्यांना मारहाण करण्यात आली. ही घटना रविवारी दुपारी पौड रस्त्यावरील त्यांच्या कार्यालयात घडली. या घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली.
मागील काही दिवसांपासून या चित्रपटाचे प्रमो चर्चेत आहते. या चित्रपटातील आरारा या गाण्यात स्थानिक गुंड झळकल्याचं समोर आल्यापासून हे गाणं चर्चेचा विषय ठरलं आहे. याप्रकरणी चौकशी करण्यात येणार असल्याचेही ग्रामीण पोलिसांनी म्हटले होते. अशातच चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच आज प्रविण तरडे यांच्या कार्यालयाची चार ते पाच जणांनी तोडफोड करुन त्यांना बेदम मारहाण केली आहे. हा चित्रपट शुक्रवारी राज्यभर प्रदर्शित होणार आहे.
यासंदर्भात माहिती देताना पोलीस निरीक्षक शंकर खटके यांनी सांगितले, प्रविण तरडे यांच्या कार्यालयात दुपारी तीन ते चार व्यक्ती दाखल झाल्या. त्यांनी मुळशी पॅटर्न चित्रपटातील काही दुश्य आवडली नसल्याचे सांगत ती चित्रपटातून काढण्यास सांगितले. यावरुन त्यांच्यात वादावादी होऊन त्यांनी तरडे यांना धक्का-बुक्की केली. यानंतर जाताना कार्यालयाची तोडफोड केली. यासंदर्भात कोथरुड पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा