“द फर्न रसिडेन्सी’ संचलित हॉटेल निर्मितीचा संकल्प पूर्ण

आंतरराष्ट्रीय नामांकित “हॉटेल फर्न रेसिडेन्सी’ संचलित “गजरा प्राईड हॉटेल’ मुळे ऐतिहासिक सातारा शहराच्या वैभवात आणखी भर पडली आहे. सर्व सोयी-सुविधांनीयुक्‍त असणारे हे हॉटेल लवकरच लोकांच्या सेवेत रुजू होणार आहे.

नैसर्गिक समतोल राखण्यावर भर

गजरा प्राईड हॉटेल संचलित हॉटेलची निर्मिती करत असताना पूर्णत: नैसर्गिक समतोल राखण्यावर भर दिलेला आहे. “द फर्न रेसिडेन्सी’ या ग्रुपच्या श्रृंखलेतील या हॉटेलच्या चौफेर पक्ष्यांच्या संवर्धनासाठी पूर्णत: देशी वाणाच्या विविध फळ व फूल झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले आहे. तसेच सांडपाणी व्यवस्थापनासाठी अत्याधुनिक पद्धतीची प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पातून वापरुन वाया जाणारे पाणी आवाराच्या बाहेर न सोडता शुद्ध करून ते पुन्हा परिसर स्वच्छता व बागेच्या संवर्धनासाठी वापरण्यात येणार आहे. हॉटेलमधून निर्माण होणारा घनकचरा अत्याधुनिक मशिनरी बसवून त्यापासून उत्तम क्‍वॉलिटीचे खत निर्माण होणार आहे. हे खत फळबाग व फुलबागेसाठी वापरण्यात येणार आहे.

कोरेगाव तालुक्‍यातील कुमठे गावचे हिंदूराव संपतराव जगदाळे आणि शिवाजीराव संपतराव जगदाळे या बंधूंनी आपल्या सातारा शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉटेल उभारणीचे स्वप्न पाहिले आणि आता ते सत्यातही उतरवले आहे. हिंदूराव जगदाळे यांनी साताऱ्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण घेतले तर शिवाजीराव जगदाळे हे सैनिक स्कूलमध्ये शिकले. दोघांनीही नंतर महाविद्यालयीन शिक्षण साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेच्या सायन्स कॉलेजमधून पूर्ण केले. बीएस्सी झाल्यानंतर मुंबई येथील एक्‍सेल इंडस्ट्रीज लि. येथे त्यांनी नोकरी केली. याच नोकरीच्या आधारावर जगदाळे बंधूंनी तळोजा एमआयडीसी इथे स्वत:चा केमिकल व्यवसाय सुरू केला.

आपल्या सातारा या जन्मभूमीत काही आगळं-वेगळं करण्याचा संकल्प दोघांनीही उराशी बाळगला होता, त्याला त्यांनी मूर्तरुप प्राप्त करून दिले आहे.सातारा हे अजिंक्‍यतारा किल्ल्याच्या कुशीत वसलेले निसर्गरम्य आणि सुंदर शहर आहे. जगभर मान्यता मिळालेले कास पठार सातारा शहरालगत आहे. सातारा शहरासह आजूबाजूचा निसर्ग सर्वांनाच भुरळ घालणारा आहे. जगाच्या नकाशावर ठसा उमटवलेली आंतरराष्ट्रीय हिल मॅरेथॉन स्पर्धा सातारा ते कास पठार अशी होते. भारताच्या कानाकोपऱ्यातून तसेच जगभरातील विविध देशांतून स्पर्धक मॅरेथॉनस्पर्धेसाठी तसेच कास पठार पाहण्यासाठी साताऱ्यात येत असतात.

ऐतिहासिक वारसा लाभलेले हे शहर आणि आजूबाजूचा नयनरम्य निसर्ग पाहण्यासाठी लाखो देश-विदेशी पर्यटक साताऱ्याला भेट देऊ लागले आहेत. सातारा हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने लग्न सोहळे, वैद्यकीय उपचार, उद्योग व्यवसाय यांच्या होणाऱ्या मिटींगज एकाच छताखाली होणे गरजेचे होते. तसेच सातारा जिल्ह्यातील बहुसंख्य नागरिक व्यवसाय तसेच नोकरीनिमित्ताने भारतभर तसेच भारताबाहेरही कार्यरत आहेत. ते जेव्हा साताऱ्यात येतात किंवा साताऱ्यात राहणाऱ्या नागरिकांचा मित्रपरिवार बाहेरून साताऱ्यात येतो, तेव्हा त्यांच्यासाठी सर्व सोयीसुविधांसाठी सुसज्ज व परिपूर्ण अशा हॉटेलची आवश्‍यकता जगदाळे बंधूंच्या लक्षात आली. या जगभरातून येणाऱ्या पाहुण्यांना राहण्यासाठी व जेवणखान्याची अपेक्षित सुविधा साताऱ्यात होत नाही, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या हॉटेलची याठिकाणी कमतरता आहे, हे ओळखून जगदाळे कुटुंबीयांनी सर्व सुख सोयी व सुविधांनीयुक्‍त असणरे गजरा प्राईड संचलित आंतरराष्ट्रीय हॉटेल सुरू करण्याचा एकमुखी निर्णय घेतला.

सातारा शहरात ठक्‍कर सिटीशेजारी पुणे-बंगलोर महामार्गाला लागून असलेल्या प्रशस्त जागेत हॉटेल उभारणीचा श्रीगणेशा झाला. 2014-15 मध्ये प्रत्यक्षात बांधकामाला सुरुवात झाली. आता हे बांधकाम पूर्णत्वास येत आहे. “द गजरा प्राईड’ संचलित हॉटेलची निर्मिती करत असताना जगदाळे बंधूंनी एकमुखी विचाराने आंतरराष्ट्रीय शृंखलेतील नावाजलेल्या “द फर्न रेसिडेन्सी’ ग्रुपच्या माध्यमातून नवा प्रकल्प वास्तवात आणण्याचे ठरवले. हॉटेलच्या निर्मितीची आखणी करत असताना वास्तूविशारद (आर्किटेक्‍चर) यांच्याशी चर्चा करून त्यांनी गुणवत्तेवर लक्ष केंद्रित केले.

कुठल्याही मोठ्या हॉटेलमध्ये साधारणत: 250 स्क्‍वेअर फूटच्या खोल्या असतात. साताऱ्यातील गजरा प्राईड संचलित “हॉटेल फर्न’मध्ये 90 रुम निघू शकल्या असत्या. मात्र, तसे न करता प्रशस्त रुम्स व सूट तयार करण्याचा सूज्ञ निर्णय घेण्यात आला. सध्याच्या हॉटेलमध्ये असणाऱ्या सर्व रुम्स हे 375 ते 400 स्क्‍वेअर फूट इतके मोठे आहेत. तसेच सुट्‌सही 750 स्केअर फूट इतके मोठे आहेत. 60 सुसज्ज रुम्सहे हे हॉटेल उभे राहिले आहे.

गजरा प्राईड संचलित हॉटेल फर्न पूर्णत: वातानुकुलित आहे. सर्व रुमस्‌ या प्रशस्त आहेत. हॉटेलमध्ये प्रशस्त जीम आहे. दोन मोठे कॉन्फरन्स हॉल आहेत. हॉटेलची इमारत पाच मजली आहे. हॉटेलमध्ये टेबल टेनिस फॅसिलिटी आहे. संपूर्ण हॉटेलमध्ये वायफायची सुविधा आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फर्न रेसिडेन्सीचे संपूर्ण मॅनेजमेंट या हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. देशी विदेशी हॉटेल चालविण्याचा अनुभव असणाऱ्या फर्न रेसिडेन्सी मॅनेजमेंटच्या माध्यमातून हे हॉटेल लवकरच सर्व सोयीनीं सर्वांच्या सेवेसाठी रुजू होणार आहे.

हॉटेलमध्ये असलेल्या सुविधा
-प्रशस्त रुम
-संपूर्ण वातानुकूलित हॉटेल
-प्रशस्त जीम
-टेबल टेनिस खेळाची सुविधा
-दोन कॉन्फरन्स हॉल
-संपूर्ण इमारतीत वायफाय
-सुसज्ज स्वागत कक्ष

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here