द फर्न क्‍लब संघाचा सनसनाटी विजय

पुणे – गटसाखळी फेरीत पांडुरंगा, विजय निचाणी, दिलीप कुमार यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर अमनोरा द फर्न क्‍लब संघाने द बॉल हॉग्ज संघाचा 3-0 पराभव करून आजचा दिवस गाजवला.

स्पर्धेत गटसाखळी फेरीत ग गटात अमनोरा द फर्न क्‍लब संघाने द बॉल हॉग्ज संघाचा पराभव करून त्यांची विजयी मालिका खंडित केली. सामन्यात पांडुरंगा याने आदित्य अगरवालचा 32-15, 69-27, 33-35, 81-36 असा सहज पराभव करून संघाला आघाडी मिळवून दिली.

दुसऱ्या सामन्यात भारताचा मानांकित खेळाडू असलेल्या विजय निचाणी याने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत लौकिक पठारेचा 12-45, 65-58, 37-21, 54-37 असा पराभव करून संघाला विजयी आघाडी मिळवून दिली. तिसऱ्या सामन्यात दिलीप कुमार याने रोहन साकळकरला 38-26, 69-32, 27-57, 53-28 असे पराभूत करून संघाला 3-0असा एकतर्फी विजय मिळवून दिला. फ गटात पांडे डिझाईन संघाने प्राधिकरण युथ फोरमचा 3-0 असा पराभव करून विजयी सलामी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)