बनावट गांधी कॉंग्रेसला संपवतील- शिवराज चौहान

राहुल यांना केले लक्ष्य

नागपूर -देशाला स्वातंत्र्य मिळवून देणे हे कॉंग्रेसचे उद्दिष्ट असल्याचे महात्मा गांधी यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी कॉंग्रेस बरखास्त करण्याची इच्छा व्यक्त केली होती. बनावट गांधी त्यांचे स्वप्न पूर्ण करतील आणि कॉंग्रेस संपवतील, अशा शब्दांत भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवराजसिंह चौहान यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना लक्ष्य केले.

मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री असणारे चौहान येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर भाजपने आनंदोत्सव साजरा करण्यात वेळ दवडला नाही. पक्षाने तातडीने सदस्य नोंदणी मोहीम हाती घेऊन विस्तार कार्य सुरू केले. त्याउलट, कॉंग्रेससारखे पक्ष व्हेंटिलेटरवर आहेत. कठोर मेहनत घेण्याची गरज असताना कॉंग्रेसचे अध्यक्ष ऍक्‍शनमध्ये नाहीत. त्यांनी राजीनामा दिला आहे. बुडणारे जहाज वाचवण्यासाठी त्याचा कॅप्टन प्रयत्न करतो.

मात्र, कॉंग्रेसच्या कॅप्टननेच आधी उडी घेतली, अशी खिल्लीही त्यांनी उडवली. भाजपच्या देशव्यापी सदस्य नोंदणी मोहिमेचा प्रभार चौहान यांच्यावर सोपवण्यात आला आहे. त्यासाठी सध्या ते देशभरात फिरत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)