फडणवीस सरकार गुजरातच्या दावणीला बांधले गेले आहे- धनंजय मुंडे

नागपूर: सहावीच्या भूगोल विषयाच्या पुस्तकात गुजराती धडे छापल्याचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी समोर आणल्यानंतर विधानपरिषदेमध्ये जोरदार रणकंदन माजले. त्यानंतर महाराष्ट्र सरकार हे गुजरातच्या दावणीला बांधले गेले आहेत, अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली.

“शासनाकडून छापण्यात आलेल्या सहावीच्या भूगोलाच्या पुस्तकात काही पाने गुजराती भाषेत छापली गेल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे महाराष्ट्रातली भाजपा आणि महाराष्ट्र सरकार हे गुजरातच्या दावणीला बांधले गेले आहेत, हे यातून स्पष्ट होते”, अशे धनंजय मुंडे म्हणाले.

धनंजय मुंडे पुढे म्हणाले, भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात गुजरात भिनले आहे. येणाऱ्या काळात भाजपचे सरकार महाराष्ट्र गुजरातला विकणार की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. यावरून राज्यातील फडणवीस सरकार गुजरातच्या दावणीला बांधले गेले आहे, हे स्पष्ट होते.

मुंडे यांनी शिवसेनेवर देखील टीका केली. या प्रकरणावर शिवसेनेने एकही शब्द काढला नाही. दुटप्पी भूमिका घेणाऱ्या शिवसेनेची मांजर होताना दिसत असल्याचे मुंडे म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)