“प्रायोगिक रस्ता” ठरतोय वाहन चालकांना गैरसोयीचा

विविध विकास प्रकल्पांसाठी “प्रायोगिक रस्ता’ अशी ओळख बनलेल्या सातारा रस्ता येथील वाहन चालकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. सतत चालू असणारी विकासकामे, बीआरटी मार्गावरील राडारोडा, अनेक ठिकाणी उखडलेले, खड्डे पडलेले, योग्य लेव्हलिंग न केलेले आणि अरूंद रस्ते अशा विविध कारणांमुळे या रस्त्यावरील वाहनचालकांची गैरसोय होत आहे, मात्र या गैरसोयीकडे दुर्लक्ष करत महापालिका प्रशासन आपल्या जबाबदारीपासून पळ काढत आहे.

कात्रज, बिबवेवाडी, धनकवडी, सहकारनगर अशा महत्वपूर्ण भागांना जोडणाऱ्या सातारा रस्त्यावरून दररोज लाखोंच्या संख्येने वाहनांची ये-जा होत असते. बीआरटी या सार्वजनिक वाह्तुकीतील महत्वकांक्षी प्रकल्प आणि गेल्याच वर्षी उदघाटन झालेल्या दोन उड्डाणपुलांमुळे या रस्त्यावरील वाहतुक सुरळीत आणि जलद होईल, अशी अपेक्षा नागरिकांना होती. मात्र उड्डाणपुलांमुळे अरूंद झालेले रस्ते, बीआरटीचे रखड लेले काम यामुले सातारा रस्त्यावरील वाहतुकीच्या समस्येत भरच पडली आहे. यातच बसथांबे नसल्यामुळे बसेस मध्य रस्त्यावर थांबल्याने वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कात्रज येथे गेले अनेक महिने सुशोभिकरणाचे काम सुरू आहे. तसेच याठिकाणी बस डेपो असल्याने या बसेस ना वळण्यासाठी मोठे कसरत करावी लागते. यामुळे मुख्य चौकात वाहतूक कोंडी होत असते. तसेच कात्रज प्राणीसंग्रहालयासमोरील येथील रस्ता अनेक ठिकाणी उखडलेला आहे. याठिकाणी रस्त्याचे “लेव्हलिंग’ व्यवस्थित न केल्याने अनेकदा पावसाचे पाणी साचणे, ड्रेनेज लाइन, पाईपलाईन फुटणे असे प्रकार घडत असतात. तर भारती विद्यापीठ येथे बसथांबा नसल्याने अनेक बसेस भर रस्त्यात उभ्या राहतात त्यामुळे वाहतूक मंदावते. धनकवडी उड्डाणपुलाच्या सुरवातीलाच एस.टी. बसेस उभ्या राहिल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतो.

भापकर पेट्रोल पंपासमोरील रस्त्यावर दोन महिन्यांपूर्वी पाइपलाइन’चे काम चालू होते. यासाठी पेट्रोल पंपासमोरील रस्ता खोदण्यात आला होता. मात्र दोन महिने उलटूनही या ठिकाणी राडारोडा अद्याप पडून आहे. तसेच येथील रस्ते योग्य प्रकारे न बुजवता, वरवर खडी टाकून ते खड्डे बुजविण्यात आले आहे. तसेच काही ठिकाणी रस्ते उखडलेले आहेत. याठिकाणी पावसाचे पाणी साचल्यने अनेकदा किरकोळ अपघातही घडले आहेत.

सातारा रस्त्यावर पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी कोणताही सुरक्षित पर्याय नाही. सतत सुरू असलेल्या वाहनांच्या वर्दळीतून जीव मुठीत धरून नागरिक रस्ता ओलांडत असतात. त्यातच बीआरटीचे थांबे रस्त्याच्या मध्यमागी असल्याने पादचाऱ्यांचा अडचणीत भरच पडते. एकूणच विविध विकास प्रकल्प अस्तित्वात असूनही, सातारा रस्त्याचे अस्तित्व धोकादायक बनले आहे. त्यामुळे सतत वेगवेगळे प्रकल्प राबविण्यापेक्षा आहे ते प्रकल्प पूर्णत्वास नेऊन या रस्त्यावरील वाहतूक जलद, सुरळीत आणि सुरक्षित करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)