बारामतीतील महाआरोग्य शिबिरात 16 हजार 500 जणांची तपासणी

 450 पेक्षा अधिक डॉक्‍टरांनी केली तपासणी 
एकाचवेळी 100 जणांची काही क्षणांत नोंदणी 
बारामती – येथील महाआरोग्य शिबिरात राज्यभरातून 129 दवाखान्यांमधील 450 पेक्षा अधिक डॉक्‍टरांनी तालुक्‍यातील 16 हजार 500 जणांची तपासणी व उपचार केले. या शिबिरात मुंबई, पुण्यासह सोलापूर, सातारा जिल्ह्यातील 36 मोठ्या खासगी मल्टीस्पेशालिटी दवाखान्यांसह 129 दवाखाने सहभागी झाले होते.
जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी पुढाकार घेऊन जिल्हा परिषद व नगरपरिषदेच्या सहकाऱ्याने बारामतीतील महिला शासकीय रुग्णालयात आयोजित या महाआरोग्य शिबिराचे उद्‌घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष विश्‍वास देवकाते यांनी केले. याप्रसंगी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, जिल्हा परिषदेचे आरोग्य विभागाचे सभापती प्रवीण माने यांच्याह नागरिक उपस्थित होते. या शिबिरात आज (रविवारी) योग्य नियोजनामुळे नागरिकांची संख्या भरपूर असूनही शांततेत व गर्दी न होता तपासणी करण्यात आली. या शिबिरासाठी रुग्णालयाबाहेर एकाच वेळी 100 जणांची काही क्षणात नोंदणी होईल अशी व्यवस्था करण्यात आली होती. बारामतीतील तुळजाराम चतुरचंद, विद्या प्रतिष्ठान व शारदानगरच्या शैक्षणिक संकुलांमधील विद्यार्थ्यांनी यामध्ये स्वयंसेवक म्हणून भूमिका पार पाडली. तर राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही या नियोजनात होते. बारामती शहरातील बहुतेक सर्व दवाखाने अशा खासगी 36 मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसह पुणे जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांतील तज्ज्ञ, निरामय फाऊंडेशन, मेडीकोज गिल्ड, बारामती नेत्रतज्ज्ञ संघटना या संघटनांनीही या शिबिरासाठी हातभार लावला. या शिबिरात आवश्‍यकता असलेल्या नेत्ररुग्णांपैकी 100 जणांवर बारामतीतील नेत्रतज्ज्ञ मोफत शस्त्रक्रिया करणार आहेत, तशी घोषणा या शिबीरात रोहित पवार यांनी केली.
विश्‍वास देवकाते म्हणाले की, जिल्हा परीषदेने महाआरोग्य शिबिरे सुरू केली. आता मेंदूच्या विकारासाठी जिल्हा परिषद देत असलेले 15 हजार कमी पडतात म्हणून 25 हजार रुपये मदत देण्याचा विचार आहे. बारामतीत मागील महाआरोग्य शिबिरात तीन हजारांवर मोफत शस्त्रक्रिया झाल्या. मागील वर्षी 23 हजार जणांची तपासणी करण्यात आली होती, असे त्यांनी नमूद केले. यावेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांचे भाषण झाले. तर जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
जिल्हा परिषदेमार्फत सुरू असलेल्या महाआरोग्य शिबिरांमध्ये सहा तालुक्‍यात आतापर्यंत 26 हजार जणांची तपासणी झालेली आहे. मात्र एकट्या बारामतीत तेवढ्या रुग्णांची तपासणी झाली.
– प्रवीण माने, सभपाती, आरोग्य व बांधकाम विभाग, पुणे जिल्हा परिषद
बारामती तालुक्‍यातील गावागावातून बसेसची व्यवस्था करण्यात आली होती.
बारामती शहरातील नागरिकांसाठी रिक्षा वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली होती.
महाशिबिरासाठी राज्यभरातून सरसावले मदतीचे हात
दानशूरांकडून केळी व अल्पोपहाराची सोय
बारामती नेत्रतज्ज्ञ संघटनेने 100 शस्त्रक्रिया मोफत करण्याचे केले जाहीर
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)