राज्यातील इंग्रजी शाळा सोमवारी बंद

पुणे – राज्य शासनाने इंग्रजी माध्यमांच्या विविध मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ इंडिपेन्डंट इंग्लिश स्कुल्स असोसिएशनच्या (आयईएसए) वतीने येत्या सोमवारी (दि.25) राज्यातील इंग्रजी शाळा बंद ठेवण्यात येणार आहे.

1 नोव्हेंबर 2018 च्या शासन निर्णय तत्काळ मागे घेण्यात यावा व 2012 ते 2019 पर्यंतच्या “आरटीई’च्या 25 टक्‍के प्रवेशांचा थकीत फी परतावा शाळांना तातडीने मिळावा, राज्यातील सर्व शाळांसाठी शाळा सुरक्षा कवच कायदा करण्यात यावा, 18 नोव्हेंबर 2013 च्या शासन आदेशात दुरुस्ती करण्यात यावी व शालेय विद्यार्थी वाहतुकी संदर्भात मुख्याध्यापकांऐवजी शाळेने नियुक्त केलेल्या वाहतूक व्यवस्थापकांवर जबाबदारी सोपविण्यात यावी, स्वयं अर्थसहीत तत्त्वावर दर्जा वाढ करण्याच्या प्रस्तावांसाठी ऑनलाइन प्रक्रिया तातडीने सुरू करावी, या मागण्या शासनाकडे अनेकदा करण्यात आल्या होत्या. मात्र, शासनाकडून त्यांची दखल घेण्यात आली नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आता पुन्हा या मागण्यांकडे शासनाने लक्ष वेधून घेण्यासाठी एक दिवस इंग्रजी शाळा बंद ठेवण्यात येणार आहे. असे आयईएसएचे प्रदेश कार्याध्यक्ष राजेंद्र सिंग यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी प्रदेशाचे खजिनदार राजीव मेंदीरत्ता, सहसचिव ओम शर्मा, पुणे विभागीय समन्वयक मिलिंद लांडगे, विजय जोशी, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष श्रीधर साईनाथ आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)