निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडेल

केंद्रीय निवडणूक निरीक्षक एस. हरीकिशोर

पुणे –
शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी 29 एप्रिल रोजी मतदान होणार असून, निवडणूक शांततेत आणि पारदर्शी वातावरणात पार पडेल, असा विश्‍वास केंद्रीय निवडणूक निरीक्षक एस. हरीकिशोर यांनी व्यक्‍त केला.
जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक लढविणारे उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी यांची सभा आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी निवडणूक खर्च निरीक्षक रंजन श्रीवास्तव, शिरुरचे निवडणूक निर्णय अधिकारी रमेश काळे, निवडणूक खर्च व्यवस्थापनचे समन्वय अधिकारी अजित रेळेकर उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी काळे यांनी उमेदवारांच्या प्रश्‍नांना समर्पक उत्तरे देत, निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना, आदेश यानुसार मतदारसंघात स्थिर सर्वेक्षण पथक, भरारी पथक, आदर्श आचारसंहिता कक्ष यांचे काम सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.

उमेदवारांनी विहित केलेल्या मुदतीत खर्च सादर होईल, याची दक्षता घ्यावी, असे निवडणूक खर्च व्यवस्थापनचे समन्वय अधिकारी अजित रेळेकर यांनी सांगितले. या बैठकीला मीडिया सेंटरच्या समन्वय अधिकारी नंदीनी आवडे, जिल्हा नियंत्रण कक्ष व सी-व्हीजीलचे सुरेश जाधव, एक खिडकी योजनेचे सुहास मापारी, उप जिल्हाधिकारी समीक्षा चंद्राकार आणि इतर उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)