निवडणूक आयोगाकडून गौतम गंभीर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

नवी दिल्ली – दोन वेगवेगळ्या मतदार यादीत नाव नोंदवून दोन्ही मतदार कार्ड मिळविल्याप्रकरणी, आम आदमी पक्षाच्या नेत्या आणि पूर्व दिल्लीतील उमेदवार अतीशी मार्लेना यांनी काल गौतम गंभीरच्या विरोधात फौजदारी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आज परवानगी न घेता प्रचारसभेचे आयोजन केल्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने गौतम गंभीर विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

पूर्व दिल्ली येथे गौतम गंभीरने शुक्रवारी कोणतीही परवानगी न घेता प्रचारसभा घेतली होती. त्यानंतर त्याच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे इतर पक्षांकडून तक्रार करण्यात आली होती. त्यामुळे आयोगाने याबाबत दखल घेत दिल्लीतील निवडणूक अधिकाऱ्यांना गंभीर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

https://twitter.com/ANI/status/1122047871463739392

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)