भाजपच्या ‘मै भी चौकीदार’ मोहिमेला निवडणूक आयोगाने फटकारले

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने भारतीय जनता पक्षास “मै भी चौकीदार” मोहिमेवरून एक नोटीस धाडले असून निवडणूक आयोगाने केलेली ही कारवाई भारतीय जनता पक्षासाठी मोठा झटका मानला जात आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मिडीया सर्टीफिकेशन अँड मॉनिटरिंग कमिटीने भाजपच्या नीरज कुमार यांना कोणतीही परवानगी न घेता सोशल मीडियावर ‘मै भी चौकीदार’ कॅम्पेनचा व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी 16 मार्च रोजी नोटीस बजावली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबत माहिती देताना, ही कारवाई 16 मार्च रोजी करण्यात आली असून समाज माध्यमांवर भाजपतर्फे निवडणूक आयोगाची परवानगी न घेता ‘मै भी चौकीदार’ हा निवडणूक प्रचाराच्या दृष्टीने बनविण्यात आलेला व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले आहे. सदर कारवाई निवडणूक आयोगाच्या मीडिया सर्टिफिकेशन अँड मॉनिटरिंग कमिटीने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)