नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकांच्या सातव्या टप्प्यातील प्रचाराची काल सायंकाळी सांगता झाली. उद्या म्हणजेच रविवारी लोकसभा निवडणुकांच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदारसंघांमध्ये निवडणुका होणार आहेत.
दरम्यान, काल प्रचाराची सांगता होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज केदारनाथ येथे दर्शनासाठी पोहोचले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केदारनाथ येथील दौऱ्यावर निवडणूक आयोगाने पंतप्रधान कार्यालयाची कानउघाडणी केली असून निवडणूक आयोगाने पंतप्रधान कार्यालयाला देशभरामध्ये अजूनही आचारसंहिता लागू आहे अशी आठवण करून दिली.
तत्पूर्वी, लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बाबा केदारनाथ यांचे दर्शन घेतले आहेत. मोदी केदारनाथला सकाळी 9 ते 9:30 वाजताच्या सुमारास हेलिकॉप्टरद्वारे पोहचले. दर्शन झाल्यानंतर मोदी संपूर्ण मंदिर परिसराचा आढावा घेणार असून, त्यानंतर ते ध्यान गुहेत जाऊन चिंतन करणार आहेत.