भाजपला दणका ! निवडणुक आयोगाने दिले अभिनंदन यांचे पोस्टर हटवण्याचे आदेश

नवी दिल्ली: सोशल मीडियावर विंग कमांडर अभिनंदन यांचे छायाचित्र असलेले पोस्टर शेअर करणाऱ्या भाजपा नेत्याला निवडणुक आयोगाने पोस्टर हटवण्याचे आदेश दिले आहेत. दिल्लीतील भाजपाचे आमदार ओम प्रकाश शर्मा यांनी फेसबुकवर विंग कमांडर अभिनंदन यांच्यासंदर्भात एक पोस्ट केली होती. त्यात विंग कमांडर अभिनंदन आणि भारतीय सैन्याने केलेल्या पराक्रमाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्नही होता.

त्यामुळे या पोस्टर्सचे फोटो वापरून केलेली फेसबुक पोस्ट हटवण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. निवडणूक प्रचार आणि वातावरण निर्मितीत समाज माध्यमांची महत्त्वाची भूमिका असते. हे लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने समाज माध्यमांसाठी काही निकष निश्चित केले आहेत. या अंतर्गत निवडणूक आयोगाने पहिली कारवाई भाजपा आमदाराच्या या पोस्टवर केली आहे.

या दोन्ही पोस्टरसंदर्भात निवडणूक आयोगाकडे ‘सी-व्हिजिल’ अ‍ॅपद्वारे तक्रार आली होती. या तक्रारींची दखल घेत निवडणूक आयोगाने हे आदेश दिले आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)