आयफेल टॉवरच्या जिन्याला लिलावात मिळाली मोठी किंमत

पॅरीस: पॅरीस मधल्या जगप्रसिद्ध आयएफेल टॉवरच्या एका बदलण्यात आलेल्या जिन्याला लिलावात मोठी म्हणजे 1 लाख 70 हजार युरो इतकी किंमत आली आहे. आयफेल टॉवरच्या ओरिजनल स्ट्रक्‍चर मधला हा जिना आहे. टॉवरच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्याला जोडणारा हा जीना होता. त्याचा लिलाव करण्याचे ठरले त्यावेळी त्याला 40 हजार ते 60 हजार युरो इतका भाव येईल असे अपेक्षित धरण्यात आले होते.

हा जिना 13 फूट उंचीचा आहे. तो तेथे 1889 मध्ये बसवण्यात आला होता. तेव्हा तो जगातील सर्वात उंचीचा टॉवर म्हणून गणला गेला होता. त्याचा हा मान चाळीस वर्ष कायम राहिला. पण नंतर 1930 साली अमेरिकेत किस्ट्रर इमारत बांधण्यात आली ती आयफेल टॉवर पेक्षा मोठी होती. या जिन्याच्या जागी 1983 साली एक लिफ्ट बांधण्यात आली त्यामुळे हा जिना तेथून काढून टाकण्यात आला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)