एकेरीवाडीत शिक्षण परिषद उत्साहात 

केडगाव – एकेरीवाडी (ता. दौंड) येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद आयोजित करण्यात आली होती. शासनाच्या वतीने पहिली ते आठवीपर्यंत अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना या शिक्षण परिषदेत प्रशिक्षण देण्यात आले.बदललेला अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका स्वरूप आणि सुलभ अध्यापन पद्धतीविषयी परिषदेत मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमाच उद्‌घाटन दौंड पंचायत समितीचे सभापती झुंबर गायकवाड यांच्या हस्ते झाले. यावेळी सदस्य सयाजी ताकवने, देलवडी गावच्या सरपंच नीलम काटे, राजेंद्र काटे, शंकर टुले, मोहन टुले, विजय टुले, केंद्रप्रमुख शेख आणि विविध शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक प्रशिक्षणार्थी उपस्थित होती. कार्यक्रमात शाळेतील मुलांनी पर्यावरण आणि माणूस यावर आधारित नाटिका सादर केली. शिवाय सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी जेजुरीचा खंडेराया यावर खंडोबा गीत सादर केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)