…म्हणून दररोज चार किलोमीटरची पायपी
माझे बारावीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर मी सैन्यदलात दाखल होणार असे ती नेहमी सांगत असे. पूर्वतयारी म्हणून ती चार किलोमीटर अंतर चालत सराव करीत असे. त्याकरिता तिने कॉलेजला जाताना आंबेगाव ते पवनानगर हे चार किलोमीटरचे अंतर पायपीट करीत होती. वैभवी ही मनमिळाऊ, हट्टी आणि हुशार विद्यार्थ्यांनी होती, असे तिच्या शिक्षकांनी सांगितले. तिच्या अकाली जाण्याने पवन मावळ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पवनानगर – पवना धरणाच्या पाणलोटक्षेत्रात वैभवीच्या आजोबांचे जमीन गेली… छोटसं गाव असल्याने धरण काठावरच गर्दी करीत गाव वसले. तिथेच लहानाची मोठी झालेली वैभवीला लष्करात भरती झालेल्या चुलत्यांकडे पाहून सैन्यदलाची आवड निर्माण झाली… लष्करात भरती व्हायचं म्हणून कॉलेजला जाताना ती रोज चार किलोमीटरची पायपीट करायची… एवढंच काय तर सुट्टीवर आलेल्या चुलत्यांकडून नेहमीच सैन्यदलातील माहिती कुतूहलाने जाणून घ्यायची… मागील आठवड्यात अचानक तिला हृदयविकाराचा धक्का बसला आणि तिचा जीवनप्रवास संपला. अन् तिचे सैनिक होण्याचे स्वप्न अधुरे राहिले.
वैभवी संतोष घरदाळे (वय 17) असे अकाली एक्झिट झालेल्या युवतीचे नाव आहे. मावळ तालुक्यातील पवन मावळ दुर्गम भागातील आंबेगावात वैभवीला जोराचा ह्रदयविकारा झटका आला. वैभवीला बुधवारी (दि. 29) दुपारी अचानक छातीत वेदना होऊ लागल्या. वडिलांनी तिला दवाखान्यात दाखल केले; तोपर्यंत वैभवीचा श्वास घेणे थांबत जगाचा निरोप घेतला.
वैभवी ही पवनानगर येथील पवना ज्युनिअर महाविद्यालयात अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत होती. वैभवी ही पवना धरणाच्या कुशीत बसलेल्या छोट्याशा आंबेगावमध्ये घरदाळे परिवारात राहत होती. पवना धरणाची पायाभरणी झाली तेव्हा धरण परिसरातील बहुतेक गावे स्थलांतरित करण्यात आली होती; परंतु आंबेगाव हे छोटेसे गाव धरणाच्या बाजुलाच स्थलांतर करण्यात आले होते. आजोबांची सर्व शेतजमीन धरण क्षेत्रासाठी संपादित झाली होती. त्या जागेचा आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा मोबदला मिळाला नाही. वैभवीचे मोठे चुलते बबन दत्तात्रय घरदाळे हे भारतीय सैन्यदलात कार्यरत आहेत. सध्या त्यांची “पोस्टिंग’ जम्मू काश्मीर येथे आहे. वैभवी ही कुटुंबातील सर्वात मोठी होती. परिवाराचा देशसेवेचा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी तिला सैन्य दलात भरती होण्याची इच्छा होती.