महापालिका रणसंग्राम २०१८: प्रारूप मतदार यादी सदोष असल्याचे सिद्ध

 प्रभाग 1 मध्ये 2680 मतदार वाढले ; बहुतांशी प्रभागातील मतदार झाले कमी

नगर: महापालिका निवडणुकीसाठी आज अंतिम मतदार यादी महापालिका प्रशासनाने जाहीर केली. प्रारूप यादी व नव्याने जाहीर करण्यात आलेल्या अंतिम यादीत मोठी तफावत आढळून आल्याने प्रारूप मतदार यादी सदोष असल्याचे सिद्ध झाले आहे. बहुतांशी प्रभागातील मतदार कमी झाले असून प्रभाग 1 मध्ये तब्बल 2 हजार 680 मतदार वाढले आहेत.

महापालिका निवडणुकीसाठी गेल्या 25 ऑक्‍टोबर रोजी प्रारूप मतदार यादी जाहीर केली होती. त्या यादीवर सर्वच राजकीय पक्षांसह इच्छुक उमेदवार व मतदारांनी अपेक्ष नोंदविला होता. तब्बल 1 हजार 895 हरकती दाखल झाल्या होत्या. या यादीवरून निवडणुक अधिकाऱ्यांवर आरोप देखील करण्यात आले होते. त्यावरून अधिकारी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले होते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर हरकती दखल झाल्याने मतदार यादी अनेक चुका असल्याचे स्पष्ट झाले होते. परंतू याबाबत महापालिका प्रशासनाकडून कोणतेही उत्तर देण्यात आले होते. आज अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार असल्याने सर्व राजकीय पक्षांसह इच्छुक उमेदवार व मतदारांचे या यादीकडे लक्ष लागले होते.

त्यानुसार प्रारूप व अंतिममध्ये मोठी तफावत आढळून आल्याचे दिसून आले आहे. त्यात प्रभाग क्रमांक 1 मध्ये यापूर्वी 10 हजार 751 मतदार होते ते आता अंतिममध्ये 13 हजार 431 झाले आहेत. याप्रमाणे सर्वच प्रभागामध्ये मतदार यादीचा गोंधळ आढळून आला आहे. त्यामुळे काही प्रभागात मतदार वाढले असून काही प्रभागात मतदार कमी झाले आहेत.
प्रभागनिहाय मतदार (कंसात प्रारूप यादीतील मतदार)- प्रभाग 1- 13431 (10751), प्रभाग 2 – 15913 (15670), प्रभाग 3 – 13517 (13609), प्रभाग 4 – 13672 (14691), प्रभाग 5 – 17023 (18630), प्रभाग 6 – 13316 (13278), प्रभाग 7 – 12771 (12832), प्रभाग 8- 14027 (14934), प्रभाग 9- 17533 (17712), प्रभाग 10- 16057 (15740), प्रभाग 11- 17016 (16388), प्रभाग 12 – 19591 (19118), प्रभाग 13 – 18078 (18763), प्रभाग 14- 14716 (15325), प्रभाग 15 – 12076 (11649), प्रभाग 16 – 15512 (15314), प्रभाग 17 – 12456 (12295).


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)