राज्यातील डॉक्टरांचे काम बंद आंदोलन सुरू 

नवी दिल्ली – डॉक्‍टरांवर होणाऱ्या हल्ल्याच्या निषेधार्थ देशभरातील डॉक्‍टर आज निषेध नोंदविणार आहेत. डॉक्‍टरांवर हल्ले करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात येणार आहे. राज्यातील सार्वजनिक रूग्णालयातील जवळपास दहा हजार डॉक्टर या आंदोलनात सहभागी होतील. त्यामुळे राज्यात आज आरोग्यसेवा कोलमडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

देशात डॉक्‍टर, तसेच रुग्णालय कर्मचाऱ्यांवर जीवघेणे हल्ले होत आहेत. सरकारी तसेच खासगी रुग्णालयातील डॉक्‍टरांना या हल्ल्यांना सामोरे जावे लागत आहे. कोलकात्यामधील एका वैद्यकीय महाविद्यालयात असा प्रकार नुकताच घडला. एका रुग्णाचे निधन झाल्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी डॉ. परिबाहा मुखर्जी आणि यश टेकवानी या कार्यरत ज्युनिअर डॉक्‍टरला मारहाण केली. त्यामध्ये त्यांच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली असून त्यांची मृत्यूशी झुंज सुरू आहे. यासाठी हा निषेध दिवस पाळण्यात येणार आहे. त्यामध्ये देशातील 3 ते 4 लाखांहून अधिक डॉक्‍टर काळ्या फिती लावून वैद्यकीय सेवा देणार आहेत.

राज्याच्या विधानसभेत महाराष्ट्र सरकारने 2010 मध्ये मान्य केलेला डॉक्‍टर हल्ला प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)