तालुक्‍यात प्रमुख रस्त्यावरील दिशादर्शक फलक गायब

प्रवासी दिशाहीन
बांधकाम विभागाचे दुर्लक्ष 

कोपर्डेहवेली – कराड तालुक्‍यातील सुर्ली घाट, कराड-मसूर, शामगाव घाट, मसूर या प्रमुख मार्गांसह अंतर्गत रस्त्यावरील दिशादर्शक फलकावर चोरट्यांनी हात साफ केल्यामुळे परिसरात नवीन असलेल्या वाहनधारकांची फसगत होत आहे. त्याचबरोबर रस्ता चुकल्यामुळे आर्थिक व वेळेची हानी होत आहे.

चोरट्यांनी हात साफ केलेल्या फलकामध्ये प्रामुख्याने गॅलवनाइज धातूचे फलक असल्याचे दिसून येत आहे. चोरट्यांकडून फलकांचा वापर घरगुती तवे बनवण्यासाठी केला जातो असे समजते. रात्रीच्या वेळी दिशादर्शक फलक चोरणाऱ्या एका भामट्याला स्थानिक युवकांनी जीव धोक्‍यात घालत पकडून कारखाना सुरक्षा रक्षकांच्या ताब्यात दिले
होते.

त्यानंतर त्या चोरट्यावर काय कारवाई करण्यात आली हे न उलगडलेले कोडेच आहे. अदखल पात्र गुन्हा म्हणून पोलीस प्रशासननाचे दुर्लक्ष होत असल्याने चोरट्यांचे फावत आहे. अशा भुरट्या चोरांवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी जनतेसह प्रवाशांमधून होत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)