जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा बदलेल : आ. जयकुमार गोरे

माढा लोकसभा निवडणूक निकालाचा विचार करता सातारा जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा बदलण्याचे संकेत मिळत आहेत. कुणालाही निवडून आणू शकतो आणि कुणालाही पाडू शकतो अशा भ्रमात वावरणाऱ्यांना जमिनीवर आणणारा माढ्याचा निकाल आहे. त्यातील काहींनी उदयनराजेंनाही दगाफटका करण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रवादीने आजपर्यंत कायमच माझ्या पाठित खंजीर खुपसण्याचे काम केले आहे.

माझ्यावर खोटे आरोप करुन, खोट्या केसेस दाखल करुन मला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीने केला आहे. लोकसभा निवडणुकीत माझ्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचा माज मोडायचे ठरवले होते. आजच्या निवडणूक निकालावरुन कार्यकर्त्यांनी आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या जनतेने ते सिद्ध करुन दाखवले. जे मला संपवायला निघाले होते त्यांना चांगलाच धडा शिकवला आहे. राजकारणात माज आणि मस्ती चालत नाही. कोणत्याही गोष्टीला अंत असतो हेच माझे विरोधक विसरले होते. माढ्याचा निकाल जिल्ह्याच्या राजकारणाला वेगळी दिशा देणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)