वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे अन्नत्याग आंदोलन

पुरवठादाराकडील धान्य बंद, अधीक्षकांच्या कार्यमुक्‍तीनंतर आंदोलन मागे

संगमनेर – आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहातील सुमारे 120 विद्यार्थ्यांनी विविध मागण्यासाठी सुरु केलेले अन्नत्याग आंदोलन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर रविवारी सायंकाळी 24 तासांनी मागे घेण्यात आले. घुलेवाडी येथील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतीगृहात 290 विद्यार्थी आहेत. या वसतीगृहाचा अधीक्षक लाचलुचपत प्रकरणी सापळ्यात पकडला गेल्याने, या ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात रमेश उदमले यांची अधीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

शिस्तबध्द स्वभावामुळे विद्यार्थ्यांना ते जाचक वाटत होते. त्यांच्याशी झालेल्या किरकोळ वादावरुन वसतीगृहातील अन्नाचा दर्जा निकृष्ट आहे, आंघोळीला गरम पाणी मिळत नाही अशा कारणावरुन शनिवार दि. 9 रोजी सायंकाळी चार वाजल्यापासून सुमारे 120 विद्यार्थ्यांनी भोजन घेण्याचे नाकारले. त्यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली. त्यांना समजविण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ झाल्याने राजुरच्या आदिवासी प्रकल्पाचे अधिकारी संतोष ठुबे यांना बोलावण्यात आले. त्यांच्या सुचनेवरुन विद्यार्थ्यांसाठी दुसरीकडून अन्न मागविण्यात आले. तरी ते आपल्या भुमिकेवर ठाम राहिले.

अखेर रविवार नाशिकच्या उपायुक्त कार्यालयातील सह आयुक्त प्रदीप पोळ यांनी विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार दोन वर्षांपासून अन्न पुरविणारे ठेकेदार अरुण केदार यांची ठेकेदारी बंद केली. तसेच तात्पुरता कार्यभार असलेले अधिक्षक रमेश उदमले यांना कार्यमुक्‍त करुन त्यांच्या जागी अकलापूरच्या शासकीय आदिवासी वसतिगृहाचे अधीक्षक दिलीप गुंजाळ यांना एक महिन्यांसाठी तात्पुरता कार्यभार देण्यात आला आहे. या दरम्यान, बराच काळ अन्नत्याग केल्यामुळे, राजेंद्र वायाळ (वय-20) या विद्यार्थ्याला चक्कर आल्याने त्याला घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. सर्व मागण्या मान्य झाल्याने रविवारी विद्यार्थ्यांनी सायंकाळी अन्नग्रहण केले.

अन्न पुरविणाऱ्या ठेकेदार व अधीक्षकांबद्दल गैरसमजातून निर्माण झालेल्या तक्रारींचे निवारण करुन, तात्पुरत्या स्वरुपात तेथे दुसऱ्या अधीक्षकाची नियुक्‍ती केली आहे. विद्यार्थ्यांनी प्रशासनाला या संदर्भात पूर्व कल्पना देणे आवश्‍यक होते.

– संतोष ठुबे,
आदिवासी विकास प्रकल्पाधिकारी, राजूर

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)