ज्येष्ठ अभिनेते ‘दिलीप कुमार’ रूग्णालयात दाखल

नवी दिल्ली – बाॅलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 95 वर्षीय दिलीप कुमार यांना न्युमोनिया झाला असून त्यावरील उपचारासाठी काल रात्री त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिलीप कुमार यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ही माहिती समजते आहे.

दिलीप कुमार याच्यां ट्विटवर लिहिले आहे की, ‘काल रात्री दिलीप कुमार यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना न्यूमोनिया झाला असून त्यावर उपचार चालू आहेत. त्यांच्या स्वास्थासाठी प्रार्थना करा. त्याच्या तब्येतीविषयी ट्विटरवरून अपडेट देत राहू’.

यापूर्वी 5 सप्टेंबर रोजी त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यावेळी मुंबईच्या लीलावती रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले  होते, आणि 14 दिवसांच्या उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)