चिमुकल्या प्रज्वलच्या मृत्यूप्रकरणी चौकशीची मागणी

प्रशासन संबंधित शाळेस पाठीशी घालत असल्याचा कुटुंबीयांचा आरोप

प्रज्वलच्या आईचा आत्मदहनाचा इशारा
प्रज्वलचे पालक गेले तीन महिने न्यायासाठी वणवण करीत आहेत. हे प्रकरण कुणीतरी दडपत असल्याचे त्यांच्या लक्षात आले आहे. आमची कोणतीही तक्रार नसल्याबाबतचे पत्र पोलीस आपल्याकडे असल्याचे सांगतात. वास्तविक असे कोणतेही पत्र आम्ही दिले नाहीमग हा बनाव कुणाचा आहे, असा सवाल पालक करीत आहेत.न्याय न मिळाल्यास मी आत्मदहन करेन, असा इशारा प्रज्वलच्या आईने दिला आहे.

विडणी  – कोणतेही पूर्वनियोजन नसताना अपघातप्रवण क्षेत्रात शाळेने सहल नेली, त्याठिकाणी झालेल्या अपघातात अलगुडेवाडी, ता. फलटण येथील चिमुकला ठार झाला. त्या निरागस प्रज्वलच्या कुटुंबीयांनी शासन
दरबारी हेलपाटे घालूनही संबंधित संबंधित शाळा, संस्था तसेच शिक्षण अधिकारी यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. प्रशासन संबंधितांना पाठीशी घालत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. यासंदर्भात सविस्तर माहिती अशी आहे, आलगुडेवाडी येथील प्रज्वल गायकवाड हा विद्यार्थी प्रगत शिक्षण संस्थेच्या फलटण येथील कमला निमकर बालभवणात इयत्ता पाचवीत शिकत होता.

या शाळेने 4 जानेवारी 2019 रोजी शैक्षणिक सहल आयोजित केली होती. सहल लिंब येथील बारा मोटेची विहीर, मेणवली येथील ऐतिहासिक वाडा, धोम धरण आदी ठिकाणी नेण्याचे नियोजना होते.प्रत्यक्षात या ठिकाणांसह पूर्वनियोजित नसलेल्या व अपघातप्रवण क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या वडाचे म्हसवे येथे नेण्यात आली. हा प्रकार होत असताना त्याकडे विद्यार्थ्यांसमवेत असलेल्या शिक्षकांचे मात्र, गांभीर्याने लक्ष न नव्हते. यामुळे बसला वडाचे म्हसवे येथे अपघात झाला. त्यात प्रज्वलचा दुर्देवी मृत्यू झाला.

अपघात झाल्यानंतर संस्थेकडून प्रज्वलचे वडील नितीन गायकवाड यांना अपघातबद्दल कळवले. एका रुग्णवाहिकेतून प्रज्वलचे वडील नितीन गायकवाड, त्यांचे बंधू तसेच शाळेचे तीन कर्मचारी घटनास्थळाकडे रवाना झाले. मात्र, दरम्यानच्या कालावधीत प्रज्वलचा मृत्यू झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. केवळ काहींच्या निष्काळजीपणामुळे प्रज्वलला प्रणास मुकावे लागल्याची चर्चा तालुक्‍यात होऊ लागली होती. वडाचे म्हसवे येथे अपघातप्रवण क्षेत्र असा बोर्ड लिहिलेला असतानाही त्याकडे कानाडोळा होणे बेजबाबदारपणाचेच लक्षण आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता संबंधित शाळा ही जिल्हा परिषद शाळा नसल्याने कारवाई संदर्भात मर्यादा येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)