बुलडाणा जिल्ह्याचे नाव बदलण्याची मागणी

जालना: बुलडाणा जिल्ह्याचे नाव बदलून राजमाता जिजाऊनगर करण्याची मागणी करण्यात आली आहे. शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी ही मागणी केली आहे. नामांतर केले नाही तर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. जालना येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले.

विनायक मेटे म्हणाले, येत्या 12 तारखेला राजमाता जिजाऊ यांची जयंती असून याच पार्श्वभूमीवर सरकाराने बुलडाणा जिल्ह्याचे नाव बदलून राजमाता जिजाऊनगर करावे. सरकारने नामकरण केले नाही तर आम्ही मोठे आंदोलन उभारु, यावेळी त्यांनी मंत्रीपद न मिळाल्याबद्दल नाराजीही व्यक्त केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आम्ही मंत्रीपदाची वेळोवेळी मागणी करुन देखील सरकार त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने सरकारविरोधात आमची नाराजी असल्याचे त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)