तामिळनाडूत दलित मुलीचा शिरच्छेद 

सालेम – एकतर्फी प्रेमाला नकार दिला म्हणून अल्पवयीन दलित मुलीचा शिरच्छेद होण्याची धक्कादायक घटना तामिळनाडूतील सालेम जिल्ह्यात घडली. अत्तूर गावाजवळच्या एका छोट्याशा खेडेगावात या 13 वर्षीय दलित मुलीचा अंत झाला. या प्रकरणी पोलिसांनी या मुलीच्या शेजारी राहणाऱ्या एका युवकाला अटक केली आहे. दिनेश कुमार असे या युवकाचे नाव असून त्याची रवानगी सालेम तुरुंगात करण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेला आरोपी मानसिक रुग्ण असल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र पोलिसांनी हा दावा फेटाळून लावला आहे. या युवकाने संबंधित मुलीशी लगट करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र या मुलीने त्याला दाद लागू दिली नाही. तिने या युवकाबाबत आपल्या आईलाही सांगितले होते. याचा राग मनात धरून दिनेश कुमारने विळ्याने या मुलीचा शिरच्छेद केला. ही मुलगी जवळच्याच सरकारी शाळेत शिकत होती. तिचे पालक मजूरी करतात आणि त्यांना तीन मुली आहेत. त्यापैकी मयत मुलगी सगळ्यात धाकटी होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)