जालन्यात ढिगाऱ्याखाली दबून दोन युवकांचा मृत्यू

file photo

जालना – भोकरदन तालुक्‍यातील गोकुळ गाव येथे वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबून दोन युवकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. योगेश तराळ आणि अनिकेत तराळ अशी या युवकांची नावे आहेत.

ही घटना शनिवारी रात्री 10च्या सुमारास केळना नदी पात्रात ट्रॅक्‍टरमध्ये वाळू भरताना घडली. वाळूच्या ढिगाऱ्याजवळ खोदकाम करताना वाळूचा ढीग त्यांच्या अंगावर कोसळला. हा ढिगारा कोसळल्याने हे दोघेही युवक त्या ढिगाऱ्याखाली खाली दबले. याबाबत माहिती कळताच गावकऱ्यांना घटनास्थळी धाव घेत युवकांना ढिगाऱ्याखालून काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यापूर्वीच दोघांचा गुदमरून मृत्यू झाला.

दरम्यान या भागात अवैध वाळू उपशाबाबत नेहमी तक्रारी केल्या जात असताना प्रशासनाच्या दिरंगाईमुळे आणि दुर्लक्षामुळे मोठा गोरखधंदा सुरु आहे. त्यातच या दुर्दैवी घटनेमुळे गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here