मध्यप्रदेशमध्ये दोन नक्षलवाद्यांचा खात्मा 

बालाघाट – मध्य प्रदेशमधील बालाघाट जिल्ह्यात झालेल्या चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश मिळाले आहे. ठार करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांमध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे.

पोलिसांनी याबाबत बुधवारी माहिती दिली की ही चकमक बालाघाट जिल्हा मुख्यालयापासून जवळपास 80 किलोमीटर दूर असलेल्या देवर बेली भागात झाली. या चकमकीत ठार झालेले दोन्ही नक्षली हे छत्तीसगडचे रहिवासी होते. पोलिस महानिरीक्षक केपी व्यंकटेश्‍वर यांनी याबाबत सांगितले की, ठार करण्यात आलेल्या नक्षलींची ओळख मंजेश आणि नंद अशी आहे. यांनी मंगळवारी मध्यरात्रीनंतर पोलिसांवर गोळीबार केला होता. ज्यास पोलिसांनी दिलेल्या प्रत्युत्तरात दोघेही ठार झाले. मध्य प्रदेश व छत्तीसगड पोलिस अनेक दिवसांपासून या दोघांच्याही शोधात होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)