शिवसागर जलाशयात बुडून तरुणाचा मृत्यू

मेढा – सौंदरी, ता. महाबळेश्‍वर येथील युवकाचा रविवारी दुपारी कोयना नदीच्या शिवसागर जलाशयात पोहताना बुडून मृत्यू झाला. अजय दगडू कांबळे (रा. गोगवे, वय 21) असे युवकाचे नाव असून तो आपल्या मामाकडे सौंदरी या गावी आला होता. रविवार असल्याने अजय आपल्या गावावरून मामाकडे सुट्टीसाठी आला होता. कडक उन्हाची चाहूल लागल्यामुळे अजय इतर 4 मित्रांसोबत दुपारी साडेबाराच्या दरम्यान पोहण्यासाठी शिवसागर जलाशयात उतरले.

अजयला पोहताना येत नसताना देखील मित्रासमवेत तोही पोहण्यासाठी पात्रात उतरला. परंतु, पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडू लागला इतर सर्व मित्रांनी त्याला वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले, पण अपयश आले. यानंतर मित्रांनी गावाकडे धाव घेत घडलेला प्रकार गावकऱ्यांना सांगितला. माहिती समजताच स्थानिक व कातकरी समजातील युवकांनी नदीवर अजयचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु नदीचे पात्र खोल असल्यामुळे महाबळेश्‍वर ट्रेकर्सला पाचारण करण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)