दरीत पडल्याने युवकाचा मृत्यू

सज्जनगड येथील घटना

सातारा – सज्जनगड, ता. सातारा येथील किल्ल्यावरून पडून एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. तब्बल चोवीस तासानंतर मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना यश आले. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सोमवारी जनार्दन शिवाजी मांडवे (वय 35, रा. निगडी वंदन, ता. सातारा) आणि रोहित हिंदुराव घाडगे (वय 25, रा. धोंडेवाडी, ता. सातारा) हे दोघे दुचाकीवरून सज्जनगड किल्ल्यावर फिरायला गेले होते.

दुपारी 12 वाजण्याच्या दरम्यान जनार्दन शिवाजी मांडवे हा युवक लघुशंकेसाठी आडबाजूला गेला असता पाय घसरून दरीत पडला. या घटनेने घाबरलेला रोहित हिंदुराव घाडगे हा दुचाकीवरून घरी येऊन झोपला. या घटनेची माहिती आज सकाळी त्यांनी नातेवाईकांना दिल्यानंतर याबाबतची माहिती सातारा तालुका पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांनी दरीत उतरून मृतदेह बाहेर काढून पोस्टमार्टमसाठी येथील जिल्हा रुग्णालयात पाठवून दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)