अण्णाद्रमुक आमदाराचा हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने मृत्यू 

कोईम्बतूर – तामिळनाडूत ऑल इंडिया अण्णा द्रमुक मुनेत्र कडगमचे (अण्णाद्रमुक) आमदार आर. कानगाराज यांचे हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने निधन झाले आहे. मृत्यूसमयी त्यांचे वय 64 वर्षे होते. सकाळी घरात वृत्तपत्राचे वाचन करत असतानाच त्यांना हृदयविकाराचा धक्का बसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या पाठीमागे पत्नी, पुत्र आणि कन्या असा परिवार आहे.

कोईम्बतूर जिल्ह्यातील सुलूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार असलेल्या कानगाराज यांना वाचविण्याचा प्रयत्न डॉक्‍टरांनी केला. पण त्यांना यश प्राप्त होऊ शकले नाही. कानगाराज हे पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले होते. मागील 35 वर्षांपासून ते अण्णाद्रमुकमध्ये कार्यरत होते. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या विधानसभेतील रिक्त जागांची संख्या 22 वर पोहोचली आहे. निवडणूक आयोगाने राज्याच्या 18 विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणूक जाहीर केली असून 18 एप्रिल रोजी त्यासाठी मतदान होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)