डास चावल्याने झालेला मृत्यू अपघात नव्हे- सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा 

नवी दिल्ली – एखाद्या किड्याच्या चावल्याने किंवा त्याच्या माध्यमातून आलेल्या जंतूंमुळे झालेले रोग हे विम्याअंतर्गत येत नाहीत, असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायलयाने दिला आहे. तसेच कोणत्या नैसर्गिक परिस्थितीत डास चावल्याने मलेरिया होऊन मृत्यू झाल्यास त्याला अपघात म्हणता येणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. हा निर्णय न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड आणि हेमंत गुप्ता यांच्या खंडपीठाने एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान दिला. मोझंबिक देशाच्या दौऱ्यावर असणाऱ्या एका बॅंक कर्मचाऱ्याला डास चावल्याने मलेरिया झाला. याच आजारात त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर या कर्मचाऱ्याच्या नातेवाईकांनी विम्याची रक्कम मिळवण्यासाठी अर्ज केला असता कंपनीने नैसर्गिक अधिवासामध्ये डास चावल्याने विम्याची रक्कम देण्यास नकार दिला. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायलयापर्यंत गेले.

येथे न्यायाधिशांनी विमा कंपनीची बाजू योग्य असल्याचा निर्णय देत नैसर्गिक अधिवास असणाऱ्या ठिकाणी किटक चावल्याने झालेला आजार विमा सुरक्षेंतर्गत येत नाही, असा निर्णय दिला. मात्र त्याचवेळी अपघात किंवा शारिरीक अडचणींमुळे घडलेल्या घटनांमध्ये किंवा अनपेक्षितपणे जंतूचे संक्रमण झाल्यास विमा कंपनीला विम्याची रक्कम द्यावीच लागेल, असेही न्यायालयाने सांगितले.

राष्ट्रीय ग्राहक मंचाने विमा कंपनीविरोधात केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायलायाने हा निर्णय दिला. डास चावल्याने मलेरिया झाल्यास तो अपघात असल्याचे म्हणता येणार नाही असा दावा कंपनीने केला होता. विमा पॉलिसीमधील अटी, कंपनीने केलेला युक्तीवाद यासर्वांच्या आधारे न्यायालयाने कंपनीच्या बाजूने निकाल दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)